आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतिय पंथियांच्या नोंदणीसाठी शिबिर घेणार :लक्ष्मी त्रिपाठी, राज्यात १३९२ तृतियपंथियांचीच नोंदणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात खासदारांच्या बैठकीत खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील तृतियपंथियांची भेट घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटले होते. तृतियपंथियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे पंतप्रधानांनी सांगितलेले असले तरी हा समाज मुख्य प्रवाहात येताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या मतदार यादीमध्ये संपूर्ण राज्यात फक्त १३९२ तृतियपंथियांनी आपली नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. तृतियपंथियांच्या हक्कासांठी लढणाऱ्या लक्ष्मी त्रिपाठी यांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शिबिरे घेण्यात येतील असे दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
१६ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील मतदारांची यादी प्रकाशित केली आहे. या यादीनुसार राज्यात कोटी १५ लाख हजार ८९४ मतदार असून यापैकी महिला मतदारांची संख्या तीन कोटी ८५ लाख ९९ हजार ५८२ असून पुरुष मतदारांची संख्या चार कोटी २९ लाख तीन हजार ९२० आहे. तर तृतियपंथियांची संख्या १३९२ आहे. ही यादी तयार करताना दोन लाख ३६ हजार दुबार नावनोंदणी रद्द करण्यात आली असून अन्य कारणांमुळे एक लाख १५ हजार मतदारांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

यापैकी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे तीन लाख ११ हजार ३२३ मतदारांची नोंदणी रद्द झालेली आहे तर अहमदनगरमध्ये ३६२३०, नांदेडमध्ये ५०२३१, सोलापूर ७४३४५ मतदारांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...