आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला कणकवलीजवळ अपघात, 27 प्रवाशी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्ग- मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गमधील खारेपाटण येथे लक्झरी बसला अपघात झाला. या अपघातामध्ये 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर कणकवली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहेत.
 
मुंबई-गोवा महामार्गावर समोरून वेगात येणा-या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बस चालकाला ट्रकला चुकवण्याचा योग्य अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्सची बस रस्ता सोडून पंधरा फूट खोल जाऊन झाली पलटी झाली. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईहून बांद्याला ही बस चालली होती. खारेपाटणजवळील संभाजीनगर येथे हा अपघात झाला.
बातम्या आणखी आहेत...