आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lay Foundation On Ambedkar Birth Anniversary Athawale Warning

आंबेडकर जयंतीला इंदू मिलची पायाभरणी हवी, अन्यथा रस्त्यावर उतरु - आठवलेंचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकप्रश्नी सहनशीलता संपली असून बाबासाहेबांच्या जयंतीला म्हणजे १४ एप्रिल रोजी स्मारकाची पायाभरणी करावी, अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी दिला. वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे
रिपाइं नेत्यांची रविवारी बैठक झाली. त्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते.

पंतप्रधान कार्यालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने सर्व कागदपत्रांची पूर्तता तातडीने करण्याचे आश्वासन दिलेले होते. परंतु केंद्र सरकारकडून इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणप्रकरणी अनेक निर्णय बाकी आहेत, असे सांगत स्मारकाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेप्रकरणी केंद्र सरकारला आता १४ एप्रिल शेवटची संधी आहे, असे आठवले म्हणाले.

जसे मराठ्यांना शैक्षणिक आणि नोक-यांत आरक्षण दिले तसे मुस्लिमांना मिळायला पाहिजे होते. जर मराठा आरक्षण घटनात्मक असू शकते तर मुस्लिम आरक्षण घटनात्मक का नाही, असा सवाल करत मुस्लिम आरक्षण नाकारल्याने फडणवीस सरकारची प्रतीमा मुस्लिमविरोधी झाल्याचे सांगत आठवले यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

पुढे वाचा.. संमतीविना भूसंपादन चुकीचे