आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात टेकडीही न चढणा-याला मिळाली एव्हरेस्ट चढाईची परवानगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न बाळगणा-यांमध्ये मुंबईच्या 18 वर्षीय भाग्यश्री सावंतचाही समावेश होता. गिर्यारोहणाचा कोणताच अनुभव पाठीशी नव्हता, तरीही 2010 आणि 2011 मध्ये शेरपांच्या मदतीने ती एव्हरेस्ट शिखराच्या जवळ पोहोचली पण शिखर सर करू शकली नाही. तिला केवळ महाराष्ट्राच्या कृष्णा पाटीलचा विक्रम मोडीत काढायचा होता. एव्हरेस्ट सर करणा-या सर्वात कमी भारतीय महिलेचा विक्रम कृष्णाच्या नावावर आहे.


भाग्यश्रीने बंच्छेद्री पाल आणि माउंट एव्हरेस्टबद्दल खूप वाचले होते. भाग्यश्री स्वत: एक चांगली अ‍ॅथलिट आहे. 18 वर्षाच्या वयात ती स्प्रिंट, सायकलिंग, रग्बी आणि कराटेच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. 2009 मध्ये कृष्णा पाटीलच्या यशाची बातमी धडकली आणि कृष्णाचा विक्रम मोडीत काढण्याची ती स्वप्ने पाहू लागली. मार्च 2010 मध्ये एव्हरेस्ट मोहिमेवर जायचे होते आणि मार्चमध्येच परीक्षाही होती. भाग्यश्रीने 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस रात्रभर जागून ती इंटरनेटवरून गिर्यारोहण आणि एव्हरेस्टची माहिती गोळा करत होती. एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी लाखो रुपये शुल्क द्यावे लागते. भाग्यश्रीसाठी हे एव्हरेस्टपेक्षाही मोठे आव्हान होते. आई एका महाविद्यालयात कारकून होती आणि त्याच वर्षी वडिलांनी नोकरी गमावली होती. कशीबशी पैशांची व्यवस्था झाली. आशियाई गिर्यारोहण कंपनीत नोंदणी करण्यात आली.


जीवनात टेकडीही न चढणाराला मिळाली ...
कंपनीने जवळच्याच 6000 फूट उंच आयलँड पीकवर प्रशिक्षण दिले. एव्हरेस्टची पहिली मोहीम सुरू झाली 2010 मध्ये. भाग्यश्रीने कधीही बर्फ पाहिला नव्हता. उणे 40 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करायचा होता. 5340 फूट उंचीवर स्थित बेस कॅम्पपासून तिची पहिली चढाई सुरू झाली. कुंबू हिमधबधब्यावर मोठमोठ्या हिमनगातून चढाई करणे सर्वात कठीण आहे. भाग्यश्रीने आपल्या कुटुंबाची सारी जमापुंजी आपल्या या स्वप्नासाठी डावावर लावली होती. त्यामुळे लक्ष्य गाठेपर्यंत थांबायचे नाही, असा निश्चय तिने केला होता. मात्र, चढाईदरम्यान तीन वेळा भाग्यश्रीची साक्षात मृत्यूशीच गाठ पडली. एकदा ती बर्फाच्या दरीत कोसळली. शेरपांनी तिला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. दुस-यांदा एक ऑक्सिजन सिलिंडर येऊन तिच्यावर धडकला आणि तिस-यांदा हाय अ‍ॅल्टिट्यूड सिकनेसमुळे तब्बल चार तास ती स्मृतीच गमावून बसली. ती कोण आहे आणि या शिखरावर काय करत आहे, हेही तिला आठवत नव्हते. माझी ही स्थिती पाहून शेरपा रडू लागला. शिखर दीड हजार मीटर दूर होते. माझा ऑक्सिजन संपत आला होता. त्यामुळे 7350 मीटर उंचीवरून शेरपाने मला परत आणले, असे भाग्यश्री सांगते. प्रसिद्धी किंवा नोकरी मिळवण्यासाठी तर ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते हौस भागवण्यासाठी एव्हरेस्टवर चढाई करतात, हे भाग्यश्रीलाही मान्य आहे. तिच्या हरियाणातील एका मैत्रिणीने तर पोलिसात पदोन्नती मिळावी म्हणून एव्हरेस्टवर चढाई केली होती. कारण एव्हरेस्टवर चढाई करणा-या तेथील एका निरक्षर मुलीला चांगल्या दर्जाची नोकरी मिळाली होती.