आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी वसूलीसाठी "अभयदान’ योजना, व्यापार्‍यांना व्याजमाफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्थानिक संस्था कर (एलबीटी) ऑगस्ट महिन्यापासून रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक व्यापार्‍यांनी अनेक महिन्यांपासून एलबीटी भरलेलाच नाही. अशा व्यापार्‍यांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अभयदान योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत व्यापार्‍यांनी एलबीटीची थकबाकी भरल्यास त्यांची व्याजाची रक्कम माफ केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली.

याबाबतचे निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘एलबीटी रद्द होणार असल्याने अनेक व्यापार्‍यांनी हा कर भरलेला नाही. १ ऑगस्टपासून एलबीटी कर रद्द केला जाणार आहेच. मात्र, या आर्थिक वर्षाचा एलबीटी ज्या नोंदीत-अनोंदीत व्यापार्‍यांनी भरलेला नाही त्यांना अभयदान योजनेअंतर्गत संपूर्ण एलबीटी भरल्यास त्यावरील व्याज माफ केले जाणार आहे.’