आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LBT Issue Solved Through Assembly Prithiviraj Chavan

विधिमंडळाच्या माध्यमातून एलबीटीचा निर्णय घेऊ - पृथ्‍वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्थानिक संस्था कराला (एलबीटी) व्यापारी आणि काही राजकीय नेत्यांकडून विरोध होत असताना विधिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येइल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रक काढून कळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही एलबीटीच्या अंमलबजावणीला विरोध झाल्यानंतर आता मुंबईमध्ये हा कर लावण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.


मुंबईतील व्यापा-यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरले असून व्यापा-यांनी व्यवसाय करावा, राजकारण करू नये. तसेच मुंबईत एलबीटीचा निर्णय विधिमंडळाच्या माध्यमातूनच सरकार घेणार असताना काही व्यापारी मात्र जनतेची दिशाभूल करत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मुंबईत आॅक्टोबरपासून एलबीटी लागू करण्याचा प्रयत्न सरकार करत असून त्याला व्यापा-यांचा विरोध आहे. त्यामुळे मुंबईत अद्याप एलबीटीची अंमलबजावणी झाली नाही. ही करप्रणाली लागू करायची असल्यास कायद्यात तशी तरतूद करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


कॉँग्रेस चव्हाणांच्या पाठीशी
काँग्रेसच्या मंत्रिमंडळपूर्व बैठकीतही या विषयावर चर्चा झाली त्या वेळी सर्व मंत्र्यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. मात्र, व्यापा-यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा आग्रहही काँग्रेसच्या मंत्र्यांनी धरल्याचे समजते.