आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी वसुलीसाठी राज्यात अभय योजना,व्याज अाणि दंडात सूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) थकीत वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात अाला. या योजनेत स्थानिक संस्था कराची थकीत मूळ रक्कम भरणाऱ्या व्यापाऱ्यांना व्याज आणि दंडातून सूट देण्यात येणार आहे.

राज्यात नव्याने एलबीटी लागू झालेल्या अनेक महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी वेळेवर कर भरलेला नाही.

त्यामुळे एलबीटी लागू असलेल्या मुंबईसह २५ महापालिकांमध्ये अभय योजना राबविण्यात येणार आहे. स्थानिक संस्था कर लागू झाल्यापासून ३१ मार्च २०१५ पर्यंत कर रकमेसाठीच ही योजना लागू राहील. अद्याप कोणतेही विवरण दाखल न केलेल्या व्यापाऱ्यांनी अभय योजनेच्या काळात विवरण दाखल करून संपूर्ण रकमेचा भरणा केल्यास व्याज आणि दंडाच्या आकारणीतून सूट देण्यात येणार आहे. संपूर्ण कर भरणा केल्यास निर्धारणेनंतर देय असणाऱ्या व्याज आणि दंडातूनही सूट देण्यात येणार आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठीचे आवेदन पत्र प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्रपणे आयुक्तांकडे सादर करावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी ३१ जुलै २०१५ नंतर केलेल्या कराचा भरणा विचारात घेतला जाणार नाही.

एक महिना कालावधी
१ जून ते ३१ जुलै २०१५ पर्यंत अभय योजनेचा कालावधी असेल. व्याज आणि दंड माफ करून घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी या कालावधीत थकीत कराची रक्कम भरणे आवश्यक आहे. ही योजना सर्व व्यापाऱ्यांसाठी आहे. योजनेच्या कालावधीत नोंदणी नसणाऱ्या व्यापाऱ्यांना नोंदणी करावी
लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...