आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leader Of Opposition Eknath Shinde Demands To Declare Draught In Marathwada

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कमी पावसामुळे मराठवाड्यात शेती तसेच पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. सरकारने मराठवाडा टंचाईग्रस्त जाहीर करण्याएेवजी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिंदे शनिवारी परभणी व हिंगाेलीच्या दाै-यावर जात आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पारडी व अनखळीवाडी व पूर्णा तालुक्यातील गणपूर व खुदा गावांतील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना ते भेटणार आहेत. यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस झाला. हिंगाेली व परभणीत तर परिस्थिती गंभीर आहे. सध्या मराठवाड्यात २८ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. मागील वर्षात या कालावधीत मराठवाड्यात एकही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत नव्हता. एकूण पीक क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र हे सोयाबीन या पिकाखाली आहे. खरीप हंगामात प्रामुख्याने कापूस, तूर व उडीद ही पिके घेतली जातात. मात्र, कमी पावसामुळे साेयाबीनच्या उत्पादनात ६० ते ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. या सर्वांचा विचार करता दुष्काळ जाहीर करणे अतिशय गरजेचे आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.