आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leading Industrialists Important Role In Indian Politics Says Munguntiwar

केंद्रातील सरकार उद्योगपतीच ठरवतील - मुनगंटीवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जनतेच्या भावनेला हात घालून सत्ता प्राप्त करण्याचे दिवस आता संपले असून मोठे उद्योजकच केंद्रात कोणाची सत्ता असावी हे ठरवतील, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
तळागाळातील मतदारांना आकर्षित करणे काँग्रेसला चांगले जमते, पण गेल्या काही काळापासून काँग्रेस यात अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. ‘आप’ला मिळालेले यश पाहून आता अनेक पक्ष शेवटच्या स्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.
भाजपही असा प्रयत्न करणार का, असे विचारता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जनतेपर्यंत पोहोचलेच पाहिजे. शेवटी त्यांच्या मतावरच निवडून यावे लागणार आहे. लोकसभेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आमचे संख्याबळ चांगले असेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे; परंतु आता वातावरण बदलल्याचे दिसून येत आहे. केंद्रात कोणाची सत्ता असावी याचा निर्णय देशातील उद्योगपतीच घेतील. उद्योगपतींचा सत्तेवर किती अंकुश आहे, याची चुणूक आपल्याला काही दिवसांपूर्वीच मिळालेली आहे. एखादा मंत्री एखाद्या उद्योगपतीला नकोसा असेल, तर त्याची बदली केली जाते. त्यामुळे यापुढे उद्योगपतींचाच वरचष्मा असणार आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.