आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- अभ्यासक्रम मग तो शाळेचा असो वा महाविद्यालयाचा नेहमीच कंटाळवाणा वाटतो. बंगळुरूस्थित लर्नहाइव्ह एज्युकेशन या कंपनीने संगणक निर्मितीत आघाडीवर असलेल्या लेनोव्हो कंपनीच्या मदतीने हाच अभ्यासक्रम आणखी सुलभ केला आहे. अगदी केजीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी अभ्यासक्रमावर आधारित अध्ययन आणखी रंजक करण्यासाठी 'पर्सनल कन्सेप्ट ट्यूटर' हे नवीन अँप उपलब्ध करून दिले आहे.
'लर्नहाइव्ह'ने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष असा गणिताचा आशय (कंटेन्ट) सादर केला असून इंग्रजी व विज्ञानाचा आशय सध्या इयत्ता पहिली ते सहावीसाठी उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास त्यांच्या गतीने शिकण्याची लवचिकता या ट्यूटरमुळे मिळते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजांशी सुसंगत अशा वैविध्यपूर्ण सामग्रीचा व साधनसंपत्तीचा वापर यात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन मौजेचे, संवादात्मक ठरण्यासाठी, तसेच ते कधीही व कुठेही मिळावे यादृष्टीने हा ट्यूटर डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, टॅब्लेट्स व स्मार्ट फोन्स अशा विविध साधनांवर उपलब्ध आहे.
'पर्सनल कन्सेप्ट ट्यूटर' अँप सर्व लेनोव्हो विंडोज 8 पीसी, नोटबुक्स व टॅब्लेट्सवर उपलब्ध होणार असून त्यासाठी 'लर्नहाइव्ह'ने 'लेनोव्हो'शी सहयोग केला आहे. हे अँप 'गुगल प्ले स्टोअर'च्या माध्यमातून लेनोव्हो अँड्राइड टॅब्लेट व स्मार्टफोनधारकांनाही उपलब्ध आहे. कंपनी 'लर्नहाइव्ह लìनग पाथवे' हे तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांच्या अध्ययनविषयक विशिष्ट गरजा निश्चित ठरवते आणि त्यांना पुढच्या टप्प्यात घेऊन जाण्यासाठी धडे व स्वाध्यायांची शिफारस करते.
केजी ते पीजीसाठी स्पर्धा- उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांना कार्यरत ठेवण्यासाठी 'लर्नहाइव्ह'ने 'लेनोव्हो'च्या सहकार्याने खास समर ऑनलाइन कॉन्टेस्ट्स या स्पर्धांची घोषणा केली आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसांसह पूर्ण वर्षभरासाठी लर्नहाइव्ह सदस्यत्व मोफत मिळणार आहे. आगामी महिन्यांत 'लेनोव्हो' व 'लर्नहाइव्ह' या कंपन्या सहकार्याने केजी ते बारावी व त्याही पुढच्या इयत्तांतील विद्यार्थ्यांसाठी अनेक लìनग टेक्नॉलॉजी सोल्युशन्स पुरवण्यात येणार आहे. 'लर्नहाइव्ह' व 'लेनोव्हो'च्या सहयोगामुळे लेनोव्होच्या ग्राहकांना संकेतस्थळावर दोन महिने खास आशय प्राप्त करण्यासाठी मोफत प्रवेश मिळणार आहे, तसेच 'लर्नहाइव्ह'च्या सर्व उत्पादनांवर त्यांना खास सवलतही दिली जात आहे. या अँप्लिकेशनमुळे विद्यार्थ्यांना संकल्पना व विषय सोप्या पद्धतीने समजून घेण्यास मदत मिळेल असे मत 'लेनोव्हो इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक अमर बाबू यांनी व्यक्त केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.