मुंबई- कल्याणमधील एका तरूणाला
आपले प्रेमसंबंध लपवून ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. प्रेयसीला फसवून दुस-याच मुलीसोबत लग्न करण्यास मंडपात हजर झालेल्या तरूणाला चांगलाच धडा शिकवला. प्रेयसी पोलिसांसह लग्नमंडपात हजर झाल्याचे कळताच नवरदेव प्रियकराने वरातीतून पळ काढल्याची घटना समोर आली आहे. सचिन सल्फी असे या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचे मागील 5 वर्षापासून तेथीलच एका 25 वर्षीय तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांत 2010 पासून प्रेमसंबंध होते. मागील 4-5 वर्षाच्या काळात दोघे अनेक ठिकाणी फिरायला गेले. त्यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. सचिनपासून तरूणी गरोदरही राहिली होती. मात्र, लग्न न झाल्याने सचिनने तिला अॅब्रॉशन करायला भाग पाडले. याचदरम्यान या दोघांनी मंदिरात जाऊन गूपचूप लग्नही केले होते. मात्र, दोघांनीही ही बाब घरी सांगितली नव्हती.
मात्र, मागील काही दिवसापासून तो तिला टाळू लागला होता. त्यातच मागील आठवड्यात प्रियकराचे लग्न होणार असल्याची माहिती तिला मिळाली. लग्नपत्रिका पाहिल्यानंतर तिचा त्यावर विश्वास बसला. त्यामुळे तिने सर्वप्रथम पोलिसांत धाव घेतली. मात्र पोलिसांनी प्रथम लक्ष घातले नाही व गुन्हा नोंदवला नाही. संबंधित तरूणीने प्रियकर सचिनला फोनवरून संपर्क साधून लग्नाबाबत चर्चा केली. मात्र त्याने झाले गेले विसरून जा असे सांगत धमकावले. अखेर धीर सुटल्याने मुलीने व तिच्या घरच्यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडे न्याय मागितला. त्यामुळे पोलिसांनी अखेर उशीरा का होईना याची दखल घेत गुन्हा दाखल केला.
सचिनचे लग्न ज्या दिवशी व ज्या ठिकाणी होते तेथे संबंधित तरूणी पोलिस फौजफाट्यासह हजर झाली. प्रियकर नवरदेव त्यावेळी वरात उरकून लग्नमंडपात हजर झाला. मात्र त्याचवेळी प्रेयसी पोलिसांसह आल्याचे समोर दिसताच त्याने तेथे धूम ठोकली व फरार झाला. तेथे उपस्थित असलेल्या दोन्ही व-डाडी मंडळींना सर्वप्रथम काहीच कळाले नाही. मात्र, नवरदेव गायब होताच तासाभरानंतर खरी कहानी सर्वांसमोर आली.