आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व गंभीर नाही : राणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / कणकवली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व गंभीर नसून सरकाविरोधात पक्ष आक्रमक नसल्याचा फटका बसत आहे, अशी टीका करतानाच गुणवत्ता न पाहता वशिल्याने काँग्रेसमध्ये पदे वाटली जात असल्याचा अाराेपही राणेंनी केला.
लोकसभा, विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर नारायण राणे विधान परिषदेत निवडून अाले. त्यानंतर त्यांचा अावाज सरकार दरबारी घुमू लागला आहे, असे वाटत होते. मात्र या घडीला लोकांच्या मनातील पूर्वीचे स्थान त्यांना मिळवता आलेले नाही, हे या निकालावरून दिसून आले. सिंधुदुर्गात ६४ पैकी ३० नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले असले तरी सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवणमध्ये नगराध्यक्षपद मात्र शिवसेना- भाजपकडेच गेले. रत्नागिरीत तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा धुव्वा उडवून शिवसेनेने भगवा फडकावला. तर, रायगडात राष्ट्रवादी-शेकापने यश मिळवले. काँग्रेसला कोकणात अपेक्षित यश न मिळाल्याने राणे पक्षाच्या नेतृत्वावर नाराज दिसले.
‘मराठा समाजात आरक्षणावरून प्रचंड नाराजी आहे. पण, काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला नाही. कार्यकर्ते मैदानावर उतरून सत्ताधाऱ्यांशी दोन हात करायला तयार असताना नेते मात्र त्यांच्या पाठीशी राहायला तयार नाहीत. अशाने पक्ष मोठा होत नसतो’, असा आक्रमक सूर राणेंनी लावला. ‘नेत्यांचा कार्यकर्ते व मतदारांना विश्वास वाटला पाहिजे. पण, लोकसभा, विधानसभेतून काँग्रेसचे नेते काही शिकले आहेत असे वाटत नाही’, असा टोलाही
राणेंनी लगावला.
बातम्या आणखी आहेत...