आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेसाठी घोडेबाजार सुरू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान परिषदेवरील 21 आमदारांची मुदत मार्चमध्ये संपत आहे. 21 पैकी 9 उमेदवार हे विधासभेचे आमदार निवडून देणार असून त्यासाठी 20 मार्चला निवडणूक होईल, तर 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त आहेत. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी सत्ताधार्‍यांसह सर्वच पक्षांमध्ये घोडेबाजार सुरू आहे.

नीलम गोर्‍हे (शिवसेना), जयप्रकाश छाजेड, शिवाजीराव देशमुख (काँग्रेस), हेमंत टकले, किरण पावसकर, रणजितसिंह पाटील, संजयकाका पाटील (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस), विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर (भाजप) यांची मुदत संपत आहे. यापैकी नीलम गोर्‍हे, विनोद तावडे व पांडुरंग फुंडकर यांची उमेदवारी निश्चित वाटत आहे.

राष्ट्रवादीकडून हेमंत टकले, रणजितसिंह पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल. संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम केला असून किरण पावसकर यांचा पक्षात घेऊन फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे संजय काका तसेच पावसकर यांच्या जागी दुसर्‍या उमेदवारांच्या शोधात राष्ट्रवादी आहे.

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांना प्रकृती साथ देत नसल्यामुळे काँग्रेस त्यांच्या जागी सत्यजितला संधी देण्याची शक्यता आहे, तर जयप्रकाश छाजेडांना पुन्हा उमेदवारी मिळते ही नाही, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरेल. ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या र्मजीतील असून इंटकचे अध्यक्ष असल्यामुळे पक्षातील त्यांचे वजन बर्‍यापैकी आहे.

शेख, नवले यांना नारळ?
काँग्रेसच्या सुभाष चव्हाण, मोहन जोशी, अलका देसाई, चरणसिंह सप्रा, सुरेश नवले व एम.एम.शेख, तर राष्ट्रवादीकडून विद्या चव्हाण, फौजिया खान, राम पंडागळे, विजयसिंह मोहिते, रमेश शेंडगे, सुमंत गायकवाड यांची मुदत संपत आहे. त्यापैकी प्रा. सुरेश नवले, एम.एम.शेख यांना निरोप देण्याची राजकीय वतरुळात चर्चा आहे.