आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Legislative Council Election News In Marathi, Marathwada, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषदेच्या‘पदवीधर’ मतदारसंघासाठी आज मराठवाड्यात मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. यापैकी 4 जागा ताब्यात असल्याने भाजपसमोर त्या राखण्याचे आव्हान असेल. तर लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर सत्ताधा-यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे.

ही निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतल्यानंतर पुणे व अमरावती हे दोन शिक्षक मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार उतरवले आहेत. तर, औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत. औरंगाबाद मतदारसंघात 19 उमेदवार भवितव्य आजमावत असले तरी खरी लढत राष्‍ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर या दोघांतच आहे.