आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणाची पातळी घसरली, आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले, लाज कशी वाटत नाही- उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राजकारणाची पातळी खूप घसरलेली आहे. आरोप करणारे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. यांना स्वतःच्या कृत्याची लाज वाटत नाही, हे भयानक असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

'आरोप कर, राजीनामा घे..' हा राज्यात पायंडा पडला तर महाराष्ट्राच्या प्रतिमेला साजेसे नाही. सुभाष देसाईंनी माझ्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार त्यांनी राजीनामा सादर केला, मात्र मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी निःपक्षपाती चौकशी करण्याचे वचन दिले आहे, तशी चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल ही अपेक्षा आहे. शिवसेना देसाईंच्या पूर्णपणे पाठीशी आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्विकारला नाही...चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार- उद्योगमंत्री
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, आज (शनिवारी) सकाळी त्यांनी 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला. मात्र, त्यांनी राजीनामा स्विकारला नाही. चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार व येणारे निष्कर्ष मान्य करणार असल्याचेही देसाईंनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

'राजीनाम्याची आवश्यकता नाही. मी राजीनामा स्वीकारणार नाही. निष्पक्ष चौकशी होईल. चौकशीअंती येणार्‍या अहवालाचा निष्कर्ष योग्यवेळी पाहू', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि देसाईंचा राजीनामा स्विकारणार नसल्याचे माहिती दिली.
 
प्रकाश मेहतांची लोकायुक्तांकडून चौकशी होणार...
सत्तेसाठी तत्त्वांची तडजोड करणार नाही, ज्या वेळी तडजोडीची वेळ येईल तेव्हा सत्तेवर लाथ मारून बाहेर पडेन, अशी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील (एसआरए) घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी लोकायुक्तांकडून, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर झालेल्या 12 हजार हेक्टर जमीन विना अधिसूचित (डिनोटिफाइड) करण्याच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी जाहीर करण्याचे जाहीर करून मित्रपक्ष शिवसेनेपुढे सपशेल लोटांगण घातले.   

विरोधी पक्षांतर्फे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात त्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ताडदेव येथील एमपी मिल कंपाउंड एसआरए प्रकल्पाबाबत झालेल्या आरोपांची प्राथमिक चोकशी केली असता ती जागा संरक्षण खात्याची असल्याचे आढळून आले आहे. यावर २००९ मध्ये बांधकाम झाले असताना अतिरिक्त एफएसआय देण्यात आला. त्यानंतर २०११ ते २०१३ मध्ये अनेक परवानग्या देण्यात आल्या. त्यानंतर मेहता यांच्या कारकीर्दीत हा एफएसआय अन्यत्र वापरण्याची शिफारस झाली. नंतर आपण त्याला स्थगिती दिली. त्यामुळे प्रत्यक्षात घोटाळा झालाच नाही. तरीही याप्रकरणी उच्च लोकायुक्तामार्फत मेहतांची चौकशी होईल. 
   
देसाईंवरील आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, एमआयडीसीने आजपर्यंत गैरअधिसूचित केलेली जमीन १६ हजार ९०९ हेक्टर आहे. यातील ९ हजार ३३५ हेक्टर जमीन गैरअधिसूचित करण्याचा निर्णय पूर्वीच्या आघाडी सरकारने घेतला होता. ७ हजार ६३४ हेक्टर जमीन गैरअधिसूचित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. याचा अर्थ त्यात घोटाळा झाला असा होत नाही. तरीही देसाई यांची स्वतंत्रपणे केली जाईल,  असेही ते म्हणाले.

गँगस्टरचा फोन सभागृहात येतो : मुंडे   
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  गँगस्टर अबू सालेम तुरुंगात वापरत असलेला मोबाइल फोन सभागृहात सादर केला. या फोनची प्रयोगशाळेत तपासणी करावी, असे निर्देेश सभापतींनी दिले.

मुख्यमंत्र्यांवर खडसेंचा निशाणा  
विरोधकांकडून बळ मिळाल्याने मग एकनाथ खडसेंनीही थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. वापर होत नाही म्हणून सरकार जर ३० एकर जमीन गैरअधिग्रहित करत असेल तर मग भोसरी येथील ज्या जमिनीबाबत माझ्यावर आरोप आहेत ती जमीन १९६८ सालापासून विनावापर पडून होती. ती जमीन मुख्यमंत्री गैरअधिग्रहित करणार का?, असा सवाल खडसेंनी केला. त्यावर विरोधक आणि खडसेंच्या आक्रमकतेने काहीसे अडचणीत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन देत सोडवणूक करून घेतली. 
 
पुढील स्लाइडवर वाचा... विरोधकांनी काय केला दावा? आणि काय आहेत प्रकाश मेहतांवरील आरोप?
बातम्या आणखी आहेत...