आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी - विरोधकांचा ‘अाखाडा’, विधिमंडळाचे कामकाज गदारोळातच तहकूब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, रणजित पाटील आदी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अामदारांनी शुक्रवारी विधान भवन परिसरात व सभागृहातही जोरदार आंदोलन केले. त्यावर सत्ताधारी आमदारांनीही राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधींचा घोटाळा तसेच तेलगी प्रकरणातील दलालांना अटक करा, असे प्रत्युत्तर दिल्याने विधानसभेत एकच गदारोळ झाला. घोषणाबाजी, फलकबाजीने दोन वेळा कामकाज तहकूब झाले. पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा चिखलफेकीचा आखाडा सुरू झाल्याने प्रश्नोत्तरासह दिवसभराचे कामकाज गोंधळातच उरकून विधानसभा तहकूब करण्यात आली.
विरोधकांनी चिक्की घोटाळा, मंत्र्यांच्या बाेगस डिग्री आणि दोन पत्नींच्या प्रकरणावरून रान उठवले. कामकाज सुरू होण्याआधी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत ‘पंकू चिक्की’चे पुडे वाटले. घोषणाबाजी देतच विरोधक सभागृहात उतरले. कामकाज सुरू होताच त्यांनी मुंडे, तावडे व लोणीकरांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवाय या विषयावरील स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. याच वेळी विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्या अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी आणि कदम यांच्या अटकेची मागणी केली. तसेच ‘तेलगी के दलालों को जुते मारो सालों को’ अशा घोषणांचे फलकही सत्ताधाऱ्यांकडून झळकावण्यात आले. त्यामुळे सभागृहात एकच गाेंधळ उडाला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, शाब्दिक टोलेबाजी