आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार इंदिरा गांधी, शरद पवारांच्या अभिनंदनाचा ठराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 24 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पंडित दीनदयाळ उपाध्याय, बाळासाहेब देसाई, नानाजी देशमुख, शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीबाबत विशेष अभिनंदन ठराव मांडला जाणार आहे. हा ठराव अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मांडण्यात येणार होता. परंतु विरोधकांनी कर्जमाफीवरुन कामकाजावर बहिष्कार घातल्याने ठरावावर चर्चा होऊ शकली नव्हती. 
बातम्या आणखी आहेत...