आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुंबईतील बोरीवलीतील अपार्टमेंटमध्ये घुसला बिबट्या, पाहा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील बोरीवली भागातील नागरिक सध्या भयग्रस्त आहेत. कारण बोरीवलीतील अपार्टमेंटमध्ये एक बिबट्या घुसल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एका कुत्र्याला लक्ष्य करण्यासाठी हा बिबट्या थेट घरात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र कुत्र्याने त्याचा डाव हाणून पाडला.
आठवड्याभरातील दुसरी घटना-
या सीसीटीव्हीत दिसून येत आहे की, बिबट्या अन्न शोधण्यासाठी फिरत होता. बिबट्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला फस्त करू पाहत होता. मात्र, अपार्टमेंटमधील कुत्रा लोखंडी दाराच्या आत होता. बिबट्या या लोखंडी दरवाजाशी झटापट करीत होता. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर कुत्र्याने भुंकायला सुरुवात केल्यानंतर बिबट्या पळून गेला. गेल्या आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, जंगल कमी झाल्याने बिबट्याला अन्न शोधावे लागत आहे. त्यातच येथील सोसायटीत 15-16 पाळीव कुत्रे असल्याने त्याचा त्याला वास लागतो. त्यामुळे तो अन्नाच्या शोधात येथे येतो. मागील आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत-
बोरीवलीतील त्या अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज वनविभागला सोपवले आहे. तसेच स्थानिक पोलिसांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. दोन वर्षापूर्वी 26 जून 2013 रोजी एका बिल्डिंगमध्ये घुसून बिबट्यावे कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यात कुत्र्याचा मृत्यू झाला होता.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, बिबट्याने हल्ला केलेली छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...