आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटीत शिरून बिबट्याने केली कुत्र्याची शिकार, CCTVत कैद झाले दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या भागात अनेकदा बिबट्या नजरेस पडतो. - Divya Marathi
या भागात अनेकदा बिबट्या नजरेस पडतो.
मुंबई- मुलंडमधील टेकवुड सोसायटीत बिबट्या दिसणे ही एक सर्वसामान्य बाब झाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ ही सोसायटी असल्याने येथे नेहमीच बिबट्या येत असतो. आता या सोसायटीत हा बिबट्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी येत असल्याचे एका सीसीटीव्हीमुळे स्पष्ट झाले आहे. त्याने 5 सप्टेंबर रोजी पहाटे 4 च्या सुमारास या सोसायटीत येत एका कुत्र्याची शिकार करत त्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेला.
 
आश्चर्यकारक बाब
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बिबट्या एका गल्लीत फिरत आहे तर कुत्रा जमिनीवर झोपलेला आहे. बिबट्या साधारणपणे अंधार असलेल्या जागेत फिरतो असे येथील लोकांचे सामान्य निरीक्षण होते पण या घटनेत त्यांच्या या समजाला बिबट्याने छेद दिला आहे. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की बिबट्या प्रखर उजेड असलेल्या भागातही फिरत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअप आणि अन्य सोशल नेटवर्किग साईट्सवर व्हायरल होत आहे. दुसरीकडे ठाणे वन विभागाने या भागात गस्त वाढवली आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडीओ
बातम्या आणखी आहेत...