पुणे - वडगाव मावळ येथे महामार्ग पोलिस सुरक्षा पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) निवृत्ती विश्वनाथ आव्हाड (वय 54 रा. लक्ष्मी कॉलनी लेन न. 4, हडपसर) यांनी नवीन मुळा-मुठा कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार) उघडकीस आली. या प्रकरणी हडपसर पोलिसासंनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, आव्हाड यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.