आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lets This Time BJP Power Come, Gopinath Munde Requested To Ganpati

भाजपची सत्ता येऊ दे! ,गोपीनाथ मुंडे यांचे गणरायाकडे साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वरळी येथील घरी गणरायाचे वाजतगाजत सोमवारी आगमन झाले. यावेळी ‘भाजपची सत्ता येऊ दे,’ असे साकडे बाप्पाला घातल्याचे मुंडे यांनी सांगितले.


रुपयाची घसरण थांबू दे, केंद्रात, आगामी निवडणुकांत भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊ दे आणि राज्यात सलग दोन वर्षे असलेले दुष्काळाचे संकट संपू दे, असे साकडे बाप्पा घातल्याचे ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे पोलिसांची आहे. ती पोलिसांनी घ्यायला हवी. गणेश मंडळावर अशी जबाबदारी टाकणे चुकीचे आहे. पोलिसांनी यंदा मंडळांना सीसीटीव्ही लावण्याची सक्ती केली केल्याचे मुंडे म्हणाले. तसेच मंडळांना खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यास भाग पाडले असून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या मंडळाचा खर्च 25 % तर मोठ्या मंडळाचा खर्च 30 % वाढला असून तो खर्च शासनाने द्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केली.


मुंबईत हलक्या सरी
नारळी पोर्णिमेनंतर मुंबईतील पाऊस गायब होतो. परंतु, गणरायाच्या आगमनाबरोबर वरुणराजाही मुंबापुरीत दाखल झाल्यामुळे गणेशभक्तांमध्ये अधिकच उत्साह दिसत होता.


42 हजार पोलिस तैनात
मुंबईत 6 हजार सार्वजनिक गणेश मंडळे असून दीड लाख घरगुती गणपतींची स्थापना होते. दहा दिवसांत काहीही गडबड न होण्यासाठी 42 हजार पोलिस तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी दिली. त्यांच्या जोडीला शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.