आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलम गोऱ्हे, शायना एन सी नंतर आता काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनाही अश्लिल मेसेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांना अश्लिल मेसेज आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांनी वाडाळा पोलिस स्टेशमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. यापूर्वी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे आणि भाजप नेत्या शायन एन सी यांनीही अश्लिल मेसेज येत असल्याची तक्रार दाखल केली होती. 

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणूकीच्या काळापासून हे मेसेजेस येत आहेत. प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार करण्यात येत असावा असे वाटले. त्यामुळे सुरूवातीला याकडे दुर्लक्ष केले. परंतु, हे मेसेज सातत्याने येत आहेत.

कोणाच्या वैयक्तीक आयुष्यात दखल देण्याचा अधिकार कोणालाच नाही, हे कृत्य पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनिय आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
 
आरोपींना लवकर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...