आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथपालांना सुधारित वेतनश्रेणी, मंत्रिमंडळात निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत ग्रंथपालांना शैक्षणिक अर्हतेप्रमाणे सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील ५१ महाविद्यालयांतील २२ ग्रंथपालांना त्यामुळे १ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी मिळणार आहे. समाजकार्य महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २०११ च्या निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आलेला आहे; परंतु त्या वेळी ग्रंथपाल पदांबाबतचा प्रस्ताव उशिरा प्राप्त झाल्यामुळे त्यांना सुधारित वेतन संरचना लागू झाली नव्हती.