आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी विकला ताजमहल तर कुणी जेलमध्‍येच थाटले सुंदर तरुणीशी लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या प्रेयसीसोबत बिकनी किलर - Divya Marathi
आपल्‍या प्रेयसीसोबत बिकनी किलर
मुंबई - तुम्‍ही अमिताभ बच्‍चन यांची प्रमुख असलेला मि. नटवरलाल पाहिलाय ? 'बंटी आणि बबली'मध्‍ये विदेशी पर्यटकांची फसवणूक करणारे प्रेमी युगुल पाहिले. पण, या कथा सत्‍यघटनेवर आधारित आहेत. भारतात असे तीन ठग होऊन गेले की ज्‍यांचे कारनाम्‍याने संपूर्ण जगात गाजले होते. त्‍यांची ही खास माहिती...

'बिकिनी किलर'
'बिकिनी किलर' या नावाने कुप्रसिद्ध असलेल्‍या चार्ल्स शोभराज या नराधमाच्‍या आयुष्‍याच्‍यावर काही महिन्‍यांपूर्वी 'मैं और चार्ल्स' हा सिनेमा आला होता. चार्ल्स शोभराजने 70 च्या दशकात दक्षिणपूर्वी आशियातील काही देशांत विदेशी पर्यटकांना नुसतेच ठगले नाही तर काहींचा खूनही केला.
प्यार, सेक्स आणि मर्डर
चार्ल्स शोभराजचा जन्म व्हियतनाममध्ये झाला. चार्ल्सची आई व्हियतनामी आणि वडील वडील भारतीय होते. चार्ल्सचे खरे नाव हतचंद भाओनानी गुरुमुख आहे. त्याचा क्राइम जगतात 'बिकिनी किलर' या नावाने ओळखले जाते.
1970 मध्ये चार्ल्सने 24 लोकांची निर्घृण हत्या केली होती. यात बहुतांशी विदेशी पर्यटक महिलांचा समावेश होता. भारतात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी महिलांना चार्ल्स गुंगीचे औषधी द्यायचा. नंतर त्यांच्यावर पाशवी बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्याही करायचा.
तिहार तुरुंगातून यशस्वी पलायन
चार्ल्सने 1976 मध्ये भारतात आलेल्या एका फ्रेंच पर्यटकांच्या समुहाला संपवले होते. तसेच इस्रायलच्या पर्यटकांची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा झाली होती. चार्ल्सची दिल्लीतील तिहार तुरुंगात रवानगी करण्‍यात आली होती. परंतु, चार्ल्स 1986 मध्ये आपल्या काही साथीदारांसोबत तेथून पोबारा करण्यात यशस्वी झाला होता. मात्र, काही दिवसांतच पोलिसांनी त्याला पुन्हा जेरबंद केले. नेपाळ येथे त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. चार्ल्स सध्या नेपाळमधील तुरूंगात आहे.
20 वर्षीय नेपाळी प्रेयसी
नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगताना चार्ल्स एका नेपाळी युवतीच्या प्रेमात पार घसरला होता. तुरुंगातच दोघांनी विवाह केला होता. विवाहाच्या वेळी निहिता 20 वर्षाची तर चार्ल्स 64 वर्षाचा होता.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ताज महल आणि लाल किल्‍ला विकणाऱ्याबाबत ....