आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षाचे असतानाच भुजबळांचे हरपले होते मातृ-पितृ छत्र, आजीने केला सांभाळ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटी (इनसेटमध्ये भुजबळ) - Divya Marathi
नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटी (इनसेटमध्ये भुजबळ)
मुंबई- महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात मनी लाँडरिंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री अटक केली. भुजबळ यांची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान भुजबळांनी सहकार्य केले नसल्याचे सांगत ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींनुसार अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भुजबळ कुटुंबीयांकडून 840 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भुजबळांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अटक करण्याचे कारण सांगा असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय आकसातून ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे. आज आपण छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत....
भायखळ्यात विकायचे भाजी-
छगन चंद्रकांत भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर, 1947 रोजी नाशिक जिल्ह्यात झाला. छगन भुजबळ चार वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील गेले. त्यांच्या आईच्या मावशीने त्यांचा व त्यांच्या भावंडाचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांचे बालपण हलाखीचे गेले. माझगावला पत्रा चाळीत ते वाढले. पुढे पोटापाण्यासाठी भायखळा भाजी मंडई बाजारात ते भाजीपाला विकू लागले. मात्र, नंतर ते तेथील जागा, दुकान गावगुंडांनी ताब्यात घेत हडप केले. पुढे काहीतरी करायचे म्हणून स्थानिक नेत्यांच्या मदतीने दिवसाला दोन रुपये भाडे गोळा करण्याचे काम सुरु केले. 2 रुपये घ्यायचे व जमेल तशी भाजी गोळा करून फूटपाथवर विकत बसायचे. तारूण्यात पदार्पण केल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला. भाजी मंडई, नातेवाईकांची शेती व या शेतीवर आधारित व्यवसाय भुजबळांनी सुरु केला. पुढे सामाजिक व राजकीय क्षेत्रात रस निर्माण झाला व त्यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
1973 मध्ये पहिल्यांदा जिंकले निवडणूक...
डिप्लोमा मिळवल्‍यानंतर भुजबळ बाळासाहेब ठाकरे यांच्‍या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत गेले. पुढे 1973 मध्‍ये भुजबळ यांनी पहिल्‍यांदा शिवसेनेकडून नगरसेवकासाठी निवडणूक लढवली. ते निवडूनही आले. 1973 ते 1984 दरम्‍यान मुंबईच्‍या नगरसेवकांमध्‍ये भुजबळ यांचे नेतृत्‍व प्रभावी होते. या 9 वर्षाच्या काळात भुजबळ महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. 1985 साली शिवसेना प्रथमच मुंबईत सत्तेत आली व बाळासाहेबांनी छगन भुजबळांना महापौरपदी बसवले. 1991 मध्ये ते दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर झाले. महापौर असताना त्‍यांनी 'सुंदर मुंबई, मराठी मुंबई' नावाचे अभियान चालवले. याच काळात भुजबळ एक मुरब्बी नेते म्हणून उद्ययास आले.
पुढे वाचा, मंडल-कुमंडलच्या वादावरून शिवसेना व बाळासाहेबांची साथ सोडली...
बातम्या आणखी आहेत...