आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षीय युवतीच्या प्रेमात पडला होता 64 वर्षांचा हा 'बिकिनी किलर'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरिअल किलरच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमन राघवच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'रमन राघव 2.0' पुढील आठवड्यात रिलीज होत आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमामध्ये किलरच्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी आहे. रमन राघव व्यतिरिक्त इतरही अनेक सिरिअल किलर्सवर सिनेमे यापूर्वीही बनवण्यात आले आहेत. यामधीलच एक आहे, बिकिनी किलर चार्ल्स शोभराज. चार्ल्सविषयी सांगितले जाते की, तो महिलांशी प्रेम संबंध निर्माण करून नंतर त्यांची हत्या करत असे. जाणून घ्या, कसे करत होता प्रेम, सेक्स आणि मर्डर....

प्रेम, सेक्स आणि मर्डर
दिल्लीतील तिहार तुरुंगातून पलायन करून 20 वर्षीय युवतीशी विवाह करणार्‍या 64 वर्षीय चार्ल्सचे आयुष्य अशा अनेक चढउतारांनी व्यापले आहे. चार्ल्स शोभराजचा जन्म व्हियतनाममध्ये झाला. चार्ल्सची आई व्हियतनामी आणि वडील वडील भारतीय होते. चार्ल्सचे खरे नाव हतचंद भाओनानी गुरुमुख आहे. त्याचा क्राइम जगतात 'बिकिनी किलर' या नावाने ओळखले जाते.

1970 मध्ये चार्ल्सने 24 लोकांची निर्घृण हत्या केली होती. यात बहुतांशी विदेशी पर्यटक महिलांचा समावेश होता. भारतात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी महिलांना चार्ल्स गुंगीचे औषधी द्यायचा. नंतर त्यांच्यावर पाशवी बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्याही करायचा.

तिहार तुरुंगातून यशस्वी पलायन
चार्ल्सने 1976 मध्ये भारतात आलेल्या एका फ्रेंच पर्यटकांच्या समुहाला संपवले होते. तसेच इस्रायलच्या पर्यटकांची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा झाली होती. चार्ल्सची दिल्लीतील तिहार तुरुंगात रवानगी करण्‍यात आली होती. परंतु, चार्ल्स 1986 मध्ये आपल्या काही साथीदारांसोबत तेथून पोबारा करण्यात यशस्वी झाला होता. मात्र, काही दिवसांतच पोलिसांनी त्याला पुन्हा जेरबंद केले. नेपाळ येथे त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. चार्ल्स सध्या नेपाळमधील तुरूंगात आहे.

20 वर्षीय नेपाळी प्रेयसी
नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगताना चार्ल्स एका नेपाळी युवतीच्या प्रेमात पार घसरला होता. तुरुंगातच दोघांनी विवाह केला होता. विवाहाच्या वेळी निहिता 20 वर्षाची तर चार्ल्स 64 वर्षाचा होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, BIKINI KILLER चार्ल्स शोभराजची निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...