आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवी गाडेकर, दिघे, शेख, भटकर मानकरी, पत्रकारिता पुरस्कारांत ‘दिव्य मराठी’चा सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे २०११, २०१२ व २०१३ या तीन वर्षांसाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले अाहेत. दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार रवी गाडेकर (अाैरंगाबाद), म. युसूफ अ. रहिम शेख (साेलापूर), नवनाथ दिघे (शिर्डी) व सतीश भटकर (अमरावती) हे चाैघे जण त्याचे मानकरी ठरले अाहेत.
तसेच लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ संपादक लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर व दिनकर रायकर यांना जाहीर झाला अाहे. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण हाेणार अाहे.
जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कारासाठी (२०११) पात्र ठरलेले लक्ष्मण जोशी हे सध्या ‘लोकशाही वार्ता’चे संपादक अाहेत, तर विजय कुवळेकर (२०१२) हे लाेकमतचे समूह संपादक असून दिनकर रायकर (२०१३) हेही लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत. २०११ च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार गटांत अाैरंगाबाद विभागातील अनंत भालेराव पुरस्कार रवी गाडेकर यांना जाहीर झाला अाहे.

४१ हजार रुपये राेख व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे. २०१२ सालचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार साेलापूर येथील पत्रकार म. युसूफ अ. रहिम शेख यांना जाहीर झाला असून, ५१ हजार राेख व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे. यंदा नाशिक विभागातील दादासाहेब पाेतनीस पुरस्कार नवनाथ दिघे (शिर्डी) व भिलाजी जिरे (सकाळ- धुळे) यांना विभागून देण्यात येणार अाहे. ५१ हजार रुपये व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे. २०१३ सालचा लाेकनायक बापू अणे (अमरावती विभाग) पुरस्कारासाठी सतीश भटकर यांची निवड झाली. ४१ हजार रुपये राेख व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे.
देठे यांनाही पुरस्कार
अाैरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे हेही यशवंतराव चव्हाण (शासकीय गट) पुरस्काराचे मानकरी ठरले अाहेत. ४१ हजार राेख व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप अाहे.