आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती चितमपल्ली यांना विंदा जीवनगौरव पुरस्कार, मराठी भाषा विभागाचे चार सर्वोच्च पुरस्कार जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना, मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्याम जोशी यांना आणि डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना जाहीर झाला अाहे, तर भारतीय विचार साधना प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार देण्यात येणार आहे. तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे भागवत पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे चितमपल्ली यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे संस्थापक श्याम जोशी यांचा पाडगावकर पुरस्काराने सन्मान हाेणार अाहे. मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी या पुरस्कारांचे वितरण हाेणार अाहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...