आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lions Club And Americans Robbins Foundation Youth Program

परदेशी शिक्षणाची ओळख घ्यायला, चला अमेरिकेत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या सॅन दिएगो येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात राहण्याची सोय असते. - Divya Marathi
अमेरिकेच्या सॅन दिएगो येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात राहण्याची सोय असते.
मुंबई - अमेरिका, युरोपातील खर्चिक शिक्षण स्वप्नवतच वाटणाऱ्या इच्छुकांच्या स्वप्नपूर्तीसाठी वांद्र्यातील लायन्स क्लब व अमेरिकेच्या राॅबिन्स फाउंडेशनचा अनोखा उपक्रम सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत १४ ते १७ वर्षे वयोगटातील १७ विद्यार्थ्यांना या संस्थांनी स्वखर्चाने अमेरिका भेटीवर पाठवले. मराठी व अन्य माध्यमांच्या शाळांचेही विद्यार्थी यात होते. सात दिवसांच्या या सहलीत तेथील शिक्षणाची तोंडओळख करून दिली गेली. उच्च शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मुलांना ही सहल फायद्याची ठरते.

लायन्स क्लब आॅफ मुंबई कार्टर रोड संस्थेचे अध्यक्ष जयसिंग बाबला यांच्या प्रयत्नांना अमेरिकेच्या अॅन्थनी राॅबिन्स फाउंडेशनची साथ आहे. विकसनशील देशांतील होतकरू मुलांना अमेरिकी विद्यापीठांची ओळख करून देतानाच ग्लोबल युथ लीडरशीपसारख्या कार्यक्रमात सहभागाची संधी मिळते. २०११ मध्ये हा उपक्रम सुरू झाला.

साबा शेखचा ‘अभ्युदय'
वर्सोवा येथील अंजुमन इस्लाम या उर्दू माध्यमाच्या दहावीत शिकणारी साबा शेख उपक्रमाद्वारे अमेरिकेत गेली होती. लाजाळू, बुजऱ्या स्वभावाची साबा आता मुस्लिम मुलींच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन या संस्थेत स्वयंसेवक आहे. गरीब मुलांच्या शिक्षणसाठी कार्यरत ‘अभ्युदय’ संस्थेसाठी ती काम करते.
अभ्यासदौऱ्यातील शिकवण
- निरपेक्ष वृत्तीने काम करा, इतरांबद्दल आत्मीयता जपा
- दिवसात एकाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलवा.
- दुसऱ्याचे दु:ख, वेदना कमी करण्याचा प्रयत्न करा
- जीवघेण्या स्पर्धेत असून विवेक ढळू देऊ नका
(अंधेरीतील मरोळ एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एंजल चतुर्वेदी हिने सांगितलेला अनुभव.)

खेळ, कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य
पाच वर्षांत १७ मुलांनी लाभ घेतला. मराठी माध्यमांचे विद्यार्थीही यात आहेत. नेतृत्वगुण वाढीस वाव म्हणून १४ ते १७ वयाची मुले निवडतात. खेळ, कला, सांस्कृतिक स्पर्धांत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असते. निवडीसाठीची मुलाखत इंग्रजीखेरीज अवगत भाषेतूनही देता येते.

उपक्रमात काय
{सॅन दिएगोच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात जगभरातून आलेल्या मुलांसोबत ७ दिवस निवास.
{ग्लोबल यूथ लीडरशिपमध्ये मोटिव्हेशनल स्पीकरचे विचार.
{जगातील मोठ्या व्यक्तींना पाहण्याची, ऐकण्याची संधी.
{व्यक्तिमत्त्व विकास, वागण्याचे प्रशिक्षण, सकारात्मक विचार.