आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लिटल मॅगझिन'चे शिलेदार चंद्रकांत खोत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ७ सप्टेंबर १९४० मध्ये चंद्रकांत खोत यांचा जन्म झाला. मुंबई येथील सात रस्त्याच्या मॉडर्न मिल कंपाउंड चाळीत ते राहत होते. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे ‘अबकडई' दिवाळी अंक. मराठीत दिवाळी अंकाच्या चळवळीला वेगळं वळण देणा-या मोजक्या अंकांमध्ये ‘अबकडई'ची गणना करावी लागेल. हा अंक त्यांनी १६ वर्षे अविरतपणे चालवला. तसेच 'चनिया मनिया बोर' सारखं मराठी बालसाहित्यात अव्वल ठरावं असं छोट्या गोष्टी आणि गाण्यांचं पुस्तक लिहिलं. दुर्गा भागवतांच्या मार्गदर्शनाखाली एक वेगळ्या स्वरूपाची अंकलिपी त्यांनी कालनिर्णयसाठी संपादित केली होती. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर त्यांनी तब्बल तीन कादंब-या लिहिल्या. लेखनातील आधुनिकता, शैलीतील रोखठोकपणा यासाठी प्रसिद्ध असलेले खोत तंत्र-मंत्र या बाबींविषयीही आस्था बाळगून होते.

खोत यांना सात आत्मचरित्रे प्रकाशित करायची इच्छा होती. सातत्याने साहित्यामध्ये काहीतरी वेगळे करण्याच्या ध्यासाने त्यांना झपाटले होते. लिटल मॅगझिन चळवळीचे ते महत्त्वाचे शिलेदार होते. त्यांना शासनाने जीवनगाैरव पुरस्काराने गौरवले खरे पण शेवटपर्यंत या मनस्वी लेखकाने साईबाबा मंदिरातच राहणे स्वीकारले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याने एक जाणकार लेखक, मासिकाचा संपादक आणि आस्वादक गमावला तर आहेच पण ज्या चिंचपाेकळी येथील पारावर ते बसायचे, त्या पाराचेही वैभव गेले.

खोत यांची ग्रंथसंपदा
-बिंब प्रतिबिंब - संन्याशाची सावली -दोन डोळे शेजारी (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी) अपभ्रंश -अनाथांचा नाथ - हम गया नही, जिंदा है
-मेरा नाम है शंकर
- गण गण गणात बोते -उभयान्वयी अव्यय -अलखनिरंजन - बाराखडी(?) - बिनधास्त -विषयांतर दुरेघी(दीर्घकथा) - मर्तिक(१९६९) .
संपादन - अबकडई (दिवाळी अंक) - इतर - गीते: घुमला हृदयी नाद हा - गीते: धर धर धरा - गीते: माळते मी माळते