आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेशनवर झोपली होती चिमुकली, तो आला इकडे-तिकडे पाहिले आणि केले हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या चिमुकलीला असे नेले पळवून. (लाल वर्तूळात अपहरण करणारा व्यक्ती) - Divya Marathi
रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या चिमुकलीला असे नेले पळवून. (लाल वर्तूळात अपहरण करणारा व्यक्ती)
गोवा- मडगाव रेल्वे स्टेशनवर आपल्या फॅमिलीसह झोपलेल्या तीन वर्षाच्या एका मुलीला एका व्यक्तीने उचलून नेले. अपहरण केल्याची ही घटना स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. पोलिसांनी केस दाखल करत व्हिडिओ फुटेजच्या मदतीने तपास सुरु केला आहे. असे अपहरण केले मुलीचे....
 
- कोकण रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 31 ऑक्टोबरच्या रात्री 1.30 वाजता घडली. एक फॅमिली आपले सामान घेऊन पोहचले आणि प्लॅटफॉर्मवर झोपले. 
- अचानक रात्री कुटुंबातील एक मुलगी उठली त्यावेळी तिला तिची बहिण दिसली नाही. तिने आईला उठवले आणि बहिण नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी इकडे-तिकडे शोध सुरु केला.  
- पूर्ण स्टेशन शोधले तरी ती चिमुकली आढळून आली नाही. यानंतर चितिंत कुटुंब जीआरपी ऑफिसमध्ये पोहचले. यानंतर जीआरपी टीमने प्लॅटफार्मवर लावलेले कॅमेरे तपासायला सुरुवात केली. 
- प्लॅटफॉर्मवर लावलेल्या कॅमे-यात ही घटना कैद झाली होती. एक हिरवी फेटा, पगडी बांधलेला एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर झोपताना दिसला होता.
- अचानक तो उठतो आणि इकडे-तिकडे पाहतो. काहीवेळ तो मुलीच्या जवळ बसतो आणि तिच्यावर चादर टाकून तिला तेथून घेऊन निघून जातो.
- जीआरपीने सांगितले की, हे कुटुंब हुबलीचे राहणारे आहे आणि मागील काही महिन्यापासून गोव्यात राहत आहे. आरोपीचा फोट कॅमे-यात कैद झाले आहेत. त्याचे फोटो गोव्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये पाठवले आहेत. लवकरच त्याला पकडले जाऊ शकते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या चिमुकलीला कसे पळवून नेले.....
बातम्या आणखी आहेत...