आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ZP Result: भाजपचे कमळ फुलले, राज्यातील 9 जिल्हा परिषदांवर निर्विवाद वर्चस्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  राज्यातील २५ जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. त्याचा निकाल आज जाहीर  झाले आहेत. राज्यातील 25 पैकी 9 जिल्हा परिषदांवर वर्चस्व राखत भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.  राष्ट्रवादी आणि काँग्रसला प्रत्येकी 6-6 जिल्हापरिषदांमध्ये बहुमत मिळाले आहे.  शिवसेनेला 3 जिल्हापरिषदांमध्ये बहुमत मिळाले आहे, तर रायगड जिल्हापरिषदेमध्ये शेकाप बहुमत मिळाले आहे. 
 
- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हापरिषदांचे निकाल आज जाहीर करण्यात आले.
 
25 जिल्हापरिषदांच्या निकालाची आकडेवारी
अाणखी तीन मनपा, आठ जि.प.वर युतीचा झेंडा शक्य
अाैरंगाबाद - शिवसेनेशी २५ वर्षांचे ‘मैत्रबंध’ ताेडून प्रथमच स्वबळावर महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामाेरे गेलेल्या भाजपने अभूतपूर्व यश मिळवले अाहे. दहापैकी अाठ महापालिकांत सर्वात माेठा पक्ष म्हणून भाजप पुढे अाला अाहे, तर २५ जिल्हा परिषदांमध्येही भरीव यश मिळवले अाहे. सुमारे पंधरा वर्षे राज्य शासन व बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता उपभाेगणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडांना सुरुंग लावून ते ताब्यात मिळविण्यात भाजपला यश अाले अाहे. त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी शिवसेना- भाजपत युतीचे प्रयत्न यशस्वी झाले तर ताे फाॅर्म्युला राज्यातही राबविला जाईल. तसे झालेच तर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ताब्यात जाऊ शकणाऱ्या अाठ जिल्हा परिषदा व तीन मनपांवरही संयुक्तरीत्या ताबा मिळवणे भाजप- शिवसेनेला शक्य हाेणार अाहे. 
 
विधानसभा निवडणुकीतही शिवसेना- भाजप स्वतंत्रपणे लढले, मात्र दाेघांनाही बहुमताचा अाकडा गाठता अाला नाही. अखेर दाेन्ही पक्षांना एकत्र येऊनच सत्ता मिळवावी लागली. शिवसेना व भाजपला मानणाऱ्या मतदारांनी ‘युती’लाच काैल दिल्याचा निष्कर्ष त्या वेळी राजकीय तज्ज्ञांनी काढला हाेता, त्याचा काही अंशी प्रत्यय अाताही येत अाहे.  मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून एकत्र असलेल्या या दाेन्ही मित्रपक्षांनी या वेळी स्वबळावर निवडणूक लढली. या दाेघांच्या भांडणात अापला लाभ हाेईल, असा विराेधी पक्षांचा कयास हाेता.
 मात्र, मुंबईच्या मतदारांनी शिवसेना- भाजपलाच समसमान काैल देऊन युतीनेच कारभार चालविण्यास भाग पाडले. मुंबई मनपात ११४ या बहुमताच्या जादुई अाकड्यापासून शिवसेनेकडे (८४ जागा) ३०, तर भाजपकडे (८२ जागा) ३२ जागांची कमतरता अाहे. ३० जागा मिळविणाऱ्या काँग्रेसची मदत घेण्यास दाेघांचीही तयारी नाही. त्यामुळे मुंबई सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा युती करावी, असा अाग्रह दाेन्ही पक्षांतील नेत्यांचा अाहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभर हाच पॅटर्न राबवावा, अशी अपेक्षा भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाेलूनही दाखवली. त्यामुळे भविष्यात त्यादृष्टीने दाेन्ही पक्षांत चर्चेच्या फेऱ्या झडतील, अशी शक्यता वर्तवली जात अाहे. असे झाल्यास मुंबईसह अाणखी तीन महापालिका व अाठ जिल्हा परिषदांमध्ये युतीची सत्ता येऊ शकेल. 
 
येथेही सत्ता मिळणे शक्य 
त्रिशंकू अवस्थेतील या जि.प.वर युतीला मिळू शकेल सत्ता : अाैरंगाबाद (भाजप २२ + शिवसेना १८), जालना (२२ + १४), हिंगाेली (१० + १५), सांगली (२३ + ३), नाशिक (१५ + २५), जळगाव (३३ + १४), यवतमाळ (१७ + २०), बुलडाणा (२४ + ९). त्रिशंकू अवस्थेतील या मनपावर युतीला मिळू शकेल सत्ता : मुंबई (भाजप ८२ + शिवसेना ८४), उल्हासनगर ( ३२ +२५), साेलापूर (४९ + २१) 
 
>औरंगाबाद जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 62
भाजपा - 23
शिवसेना - 19
काँग्रेस - 16
राष्ट्रवादी -    2
मनसे - 1
इतर - 1
 
>सातारा जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 64
कॉग्रेस - 7
भाजप - 7
राष्ट्रवादी - 39
शिवसेना - 2
इतर - 9
 
>कोल्हापूर जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 67
कॉग्रेस 14
भाजप 14
राष्ट्रवादी 11
शिवसेना 10
इतर - 18
 
>रायगड जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 59
शेकाप 21
राष्ट्रवादी 17
शिवसेना 15
कॉग्रेस 03
भाजप 03
 
>सोलापूर जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 68
राष्ट्रवादी - 23
भाजप - 15
काँग्रेस - 6
शिवसेना - 1
इतर - 23
 
>वर्धा जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 52
भाजप - 31
शिवसेना - 2
राष्ट्रवादी - 2
काँग्रेस - 13
इतर - 4
 
>यवतमाळ जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 61
शिवसेना - 20
भाजप - 18
राष्ट्रवादी -11
काँग्रेस - 11
इतर - 1
 
>अमरावती जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 59
काँग्रेस - 27
भाजप - 14
राष्ट्रवादी - 5
शिवसेना - 2
इतर - 11
 
>सांगली जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 60
भाजप - 25
राष्ट्रवादी - 14
काँग्रेस - 10
शिवसेना - 3
इतर - 8
 
>परभणी जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 54
राष्ट्रवादी - 24
शिवसेना - 13
भाजप - 5
काँग्रेस - 6
इतर - 6
 
>जालना जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 56
भाजप - 22
शिवसेना - 14
काँग्रेस - 5
राष्ट्रवादी - 13
इतर - 2
 
>गडचिरोली जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 51 
भाजप - 20
काँग्रेस - 15
राष्ट्रवादी - 04
आदिवासी विद्यार्थी संघ - 07
अपक्ष - 03
ग्रामसभा - 02
 
>सिंधुदूर्ग जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 50
काँग्रेस - 27
शिवसेना - 16
राष्ट्रवादी -    1    
भाजपा -6
 
>रत्नागिरी जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 55
शिवसेना - 39
राष्ट्रवादी -    15    
काँग्रेस - 1
 
>बुलडाणा जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 60
भाजपा - 24
शिवसेना - 10
राष्ट्रवादी -    8
काँग्रेस - 13
इतर - 5
 
>पुणे जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 75
राष्ट्रवादी -    43
शिवसेना - 14
भाजपा - 7
काँग्रेस - 7
इतर - 4
 
>नांदेड जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 60
काँग्रेस - 28
राष्ट्रवादी -    10
भाजपा - 13
शिवसेना - 10
इतर - 2
 
>बीड जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 60
राष्ट्रवादी -    25
भाजपा - 19
शिवसेना - 4
काँग्रेस - 3
इतर - 9
 
>नाशिक जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 73
शिवसेना - 25
भाजपा - 15
काँग्रेस - 7
राष्ट्रवादी -    19
इतर - 7
 
>अहमदनगर जिल्हा परिषद - अंतिम निकाल
एकूण जागा - 72
काँग्रेस- 23
राष्ट्रवादी-  18
भाजप -14
शिवसेना - 7
क्रांतिकारी शेतकरी पक्ष - 5
शेतकरी विकास मंडळ - 1
भाकप - 1
महाआघाडी - 2
जनशक्ती - 1
 
>चंद्रपूर जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 56
भाजपा - 33 
काँग्रेस - 20
इतर - 03
 
>जळगाव जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 67
शिवसेना -   14
भाजपा -   33
काँग्रेस -  4
राष्ट्रवादी -   16    
 
>हिंगोली जिल्हा परिषद- अंतिम निकाल
एकूण जागा - 52
शिवसेना -    15
भाजपा -    10
काँग्रेस -    12
राष्ट्रवादी -    12
इतर - 3
 
>लातूर जिल्हा परिषद- अंतिम निकाल
भाजपा 36
कॉंग्रेस  15
राष्ट्रवादी 5
शिवसेना 1
अपक्ष  1
 
>जळगाव जिल्हा परिषद- अंतिम निकाल
67 गटां पैकी 33 जागी भाजप विजयी 
भाजप- 33 
राष्ट्रवादी- 16
सेना - 14
काँग्रेस -04
 
>उस्मानाबाद जिल्हा परिषद - अंतिम निकाल
एकूण जागा - 55 
राष्ट्रवादी - 26
बीजेपी - 4
काँग्रेस - 13
शिवसेना - 11
भारतीय परिवर्तन सेना - 1
 
 
>पुणे जिल्हा परिषद- शिवसेना-05, भाजपा-01
नायगांव- सुनिता सानप (शिवसेना)
मुसळगांव- वैशाली ख़ुळे (शिवसेना)
देवपूर- सिमंतिनी कोकाटे (भाजपा)
नांदूर शिंगोटे- नीलेश केदार (शिवसेना)
चास- शीतल उदय सांगळे (शिवसेना)
ठाणगांव- वनिता शिंदे (शिवसेना)
 
 
>भोकरदन- भाजपा प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे यांची कन्या , आशाताई मुकेशराव पांडे सोयगावं गटातून विजयी त्यांनी राष्ट्रवादीच्या उषा मिरकर यांचा 3940 मताने पराभव केला.
 
> रायगड जिल्हा परिषद - रोहातील वरसे गटातून सुनील तटकरेंंची कन्या आदिती तटकरेंचा 8,858 मतांनी विजय
 
>जळगाव जिल्हा परिषद
>जळगाव तालूका ५ गट 
१-असोदा ममुराबाद गट - पल्लवी जितेंद पाटील - NCP 
२- कानळदा गट - प्रभाकर सोनवणे - भाजप
३- नाशिराबाद गट - लालचंद पाटील  भाजप
४- म्हसावद गट - पवन सोनवणे - सेना 
५- शिरसोली गट - बर्षा  बारी 

>यावल तालुका (एकूण ५ जागा)
१- किनगाव-डांभूर्णी गट - अरुणा रामदास पाटील (काँग्रेस)
२-हिंगोणा-सावखेडा गट - सविता अतुल भालेराव (भाजप)
३-साकळी - दहिगाव गट - रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप)
४-भालोद-पाडळसे गट - नंदा दिलीप सपकाळे (भाजप) 
५-न्हावी-बामणोद गट - प्रभाकर सोनवणे (काँग्रेस)    

>भुसावळ तालुका (एकूण ३ जागा)
१-साकेगाव-कंडारी गट - रवींद्र पाटील (राष्ट्रवादी)
२-हतनूर-तळेवल गट - सरला सुनील कोळी (शिवसेना)
३-कुऱ्हा-वराडसीम गट - पल्लवी प्रमोद सावकारे (भाजप)  

>रावेर तालुका (एकूण ६ जागा)
१-निंभोरा-तांदलवाडी गट - नंदकिशोर भागवत महाजन (भाजप)
२-एनपूर-खिरवड गट - रंजना प्रल्हाद पाटील (भाजप)
३-पाल-केऱ्हाळे गट - नंदा अमोल पाटील (भाजप)
४-थोरगव्हाण-मस्कावद गट - कैलास विठ्ठल सरोदे (भाजप)
५-विवरा-वाघोदा गट - आत्माराम सुपडू कोळी (राष्ट्रवादी)
६-चिनावल खिरोदा गट - सुरेखा बंडू पाटील (काँग्रेस)   

>बोदवड तालुका (एकूण २ जागा)
१-नाडगाव - मनूर गट - भानुदास किटकुल गुरचळ (भाजप)
२-साळशिंगी-शेलवड गट - वर्षा रामदास पाटील (भाजप)

> मुक्ताईनगर तालुका (एकूण ४ जागा)
१-कुऱ्हा-वढोदा गट - वनिता विनोद गवळे (भाजप)
२-मुक्ताईनगर-निमखेडी गट - नीलेश भागवत पाटील (भाजप)
३-अंतुल्री-उंचदा गट - वैशाली निवृत्ती तायडे (भाजप)
४-चांगदेव-रुईखेडा गट - जयपाल बोदडे (भाजप)
 
>गडचिरोली- एटापल्ली तालुक्याच्या गट्टा-पुरसलगोंदी जिल्हा परिषद क्षेत्रातून कारागृहातून निवडून लढविणारे सैनू मासू गोटा ३५८ मतांनी पाचव्या फेरी अखेर आघाडीवर आहे.

>जालना- मंठा तालुक्यातील खोराड सावंगी  जि.प गटात भाजपा आणि शिवसेना उमेदवारांना समान मते पडल्यामुळे चिठ्ठी टाकून उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. 
रेणुका हनवते (भाजपा) 3878 मते 
आशामती चव्हाण (सेना) 3878 मते 
चिठ्ठी टाकून भाजपा उमेदवार रेणुका हनवते यांना विजयी घोषित करण्यात आले .
 
>लातूर तालुक्यात निवळी गटातून काँग्रेस च्या विद्यमान अध्यक्षा सौ प्रतिभाताई काव्हेकर 1700 ने पिछाडी.
>जळगाव तालूका ५ गट राष्ट्रवादी २ भाजप २ सेना १
>वर्धा:
- तालुक्यातील सावंगी  मेघे  गटातून  बसपचे उमेश जिंदे विजयी. 
- पिपरी  मेघे  गटातून  काँग्रेसचे  संजय  शिंदे  विजयी
 
>जालना- आष्टी गटातून बबनराव लोणीकरांचे पुत्र विजयी
> यावल तालुक्यात भाजपच किंग
- आमदार हरिभाऊ जावळेंचे वर्चस्व सिद्ध. पाचपैकी तीन गटात भाजप, दोन गटात काँग्रेसचा विजय. गेल्या वेळेपेक्षा भाजपच्या दोन जागा वाढला. पंचायत समिती बहुमताने भाजपकडे. १० पैकी ५ भाजप+ 1 अपक्ष, विरोधी काँग्रेसला ४ जागा. काँग्रेसच्या सभापतीच्या गणात पराभव.
- किनगाव-डांभूर्णी गट - अरुणा रामदास पाटील (काँग्रेस) विजयी
- हिंगोणा-सावखेडा गट - सविता अतुल भालेराव (भाजप) विजयी 
- साकळी - दहिगाव गट - रवींद्र सूर्यभान पाटील (भाजप) विजयी 
- भालोद-पाडळसे गट - नंदा दिलीप सपकाळे (भाजप) विजयी
- न्हावी-बामणोद - प्रभाकर सोनवणे (काँग्रेस) विजयी
 
>चाळीसगाव- ७ गट राष्ट्रवादी ४ तर भाजप ३ ठिकाणी विजयी घोषीत
>अकोला- महानगर पालीका प्रभाग क्रमांक 3 
भारिपचे बबलू जगताप व अॅड धनश्री देव विजयी
>उस्मानाबाद-राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मराठवाडा संघटक सक्षणा सलगर विजयी
>जळगाव- शिवसेना मंत्री गुलाव राव पाटील यांचा पूत्र प्रताप विजयी
>भुसावळ- तालूका गट संख्या ३ 
>राष्ट्रवादी शिवसेना प्रत्येकी १ विजयी
> भुसावळ
- हतनूर-तळेवल गटात शिवसेनेच्या सरला सुनील कोळी विजयी. 
- हतनूर गणात भाजपच्या वंदना उन्हाळे विजयी.
- हतनूर-तळवेलमध्ये सेनेच्या सरला कोळी विजयी. 
- साकेगाव-कंडारी गटात राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील विजयी. 
- तळवेल गण शिवसेनेचे विजय सुरवाडे विजयी. सुरवाडेंना ३५८० मते. भाजपचा पराभव. सुधाकर सुरवाडे ३४५० मते.
> औरंगाबाद- पाचोड गटातून शिवसेनेचे विलास भुमरे हे दोन हजार ६१ मतांनी विजयी झाले आहेत.
> सुपे- मेडद राष्ट्रवादीचे भरत खैरे २३१४ मतानी विजयी
 
> उस्मानाबाद
- येडशी गणातुन 822 मतांनी उमेदवार संजय काका लोखंडे विजयी
- कसबे- तडवळे गणातुन सुधीर करंजकर 350 मताने विजयी. 
- येडशी - गटातुन सारिका शहाजी वाघ विजयी
 
>अमरावती 
- तळेगाव ठाकूर नामाप्र खुला सर्कल मधून काँग्रेस चे अभिजित महेंद्र बोके विजयी
- वऱ्हा नामाप्र महिला राखीव सर्कल मधून लढा संघटनेच्या गौरी संजय देशमुख विजयी
- कु-हा नामाप्र महीला राखीव काँग्रेसच्या पूजा संदीप आमले विजयी
 
>बारामती शिर्सुफळ - गुणवडी  गटातुन रोहित राजेंद्र पवार विक्रमी मतांनी विजयी. 
>रोहीत पवार शरद पवार यांचे नातू. अजित पवार यांचे पुतणे..पवारांची चौथी पिढी राजकारणात.
 
>रावेरा तालुका
- रावेर तालुका ६ पैकी जागांचे निकाल जाहीर. भाजपचे वर्चस्व. भाजप ३, राष्ट्रवादी १ आणि काँग्रेसला १ जागा
-एेनपूर-खिरवड गटात भाजपचा विजय. रंजना पाटील विजयी.
- पाल-केऱ्हाळे गट भाजप विजय - नंदा पाटील विजयी.
- विवरा-वाघोदा गटात राष्ट्रवादीचे आत्मराम कोळी ६०० मतांनी विजयी
- चिनावल-खिरोदा गटात काँग्रेसच्या सुरेखा पाटील विजयी
 
>लोहारा तालुका
सास्तूर गट - शितल पाटील (राष्ट्रवादी) विजयी
माकणी गट- अश्विनी जवळगे (कॉंग्रेस) विजयी
जेवळी गट - शोभा तोरकडे ( कॉंग्रेस) विजयी
कानेगाव गट - चंद्रकला नारायणकर (शिवसेना) विजयी
> यावल तालुका- किनगाव-डांभूर्णी गटात काँग्रेसची सरशी. अरुणा रामदास पाटील ७५३८ मतांनी विजयी. 
> भुसावळ तालुका हतनूर गणात भाजपच्या वंदना उन्हाळे विजयी
>अमरावती लोणी जिल्हा परिषद भाजप रविंद्र मुंदे 283 मतानी विजयी
>नांदगांव न्यायडोंगरी गट विजया विजय आहेर शिवसेना विजयी
>मालेगाव- रावळगाव गट समाधान हिरे भाजपा विजयी
>पाटोदा गटात तिन्ही जागा राष्ट्रवादीला 
पाटोदा गट - संजय बनकर
पाटोदा गण - सुनीता मेंगाने
धुळगाव गण - मोहन शेलार
> पालखेड गट - NCP मंदाकिनी बनकर विजयी
>आहिवंतवाडी गट शिवसेना रोहिणी गावित 1500 मतांनी विजयी
>आहिवंतवाडी गन उत्तम जाधव अपक्ष 1080 मतांनी विजयी
>टिटवे गन एकनाथ गायकवाड शिवसेना 100 मतांनी विजयी
>देवपूर गट माजी आ.कोकाटेंनी राखला सिमंतीनी कोकाटे यांचा विजय
>नाशिक जिल्हा परिषद
कळवण- मानूर गट राष्ट्रवादी डॉ भारती पवार खरडे
कळवण- दिगर राष्ट्रवादी जयश्री पवार विजयी
कळवण- अभोना कोंग्रेस यशवंत गवळी विजयी
>उस्मानाबाद- 55 पैकी, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 11, सेना4,भाजप 3⁠⁠⁠⁠
>देवळा तालुक्यातील उमराणे गटात राष्ट्रवादी चे यशवंत शिरसाठ विजयी
>  सदाभाऊ खोत याचा मुलगा बागणीतुन पराभुत
>जळगाव- बोदवडमध्ये शतप्रतिशत भाजपच. खडसेंची जादू चालली तालुक्यात पंचायत समितीच्या सर्व चार गणांमध्ये भाजपचा विजय.
>नाशिक पळसे गणात शिवसेनेच्या उज्वला जाधव विजयी
>उस्मानाबाद- आमदार राणा पाटील यांच्या पत्नी विजयी
- शिवसेना खासदार रवी गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत, 
- राष्ट्रवादी 10, भाजप 4, सेना 2
>अमरावती 
- सौ.माया प्रकाश वानखड़े भाजप 2678 (विजयी), 113 मताने भाजप चा उमेदवार विजयी
- तळेगाव ठाकूर नामाप्र खुला सर्कल मधून काँग्रेस चे अभिजित महेंद्र बोके विजयी
- वऱ्हा नामाप्र महिला राखीव सर्कल मधून लढा संघटनेच्या गौरी संजय देशमुख विजयी
> चंद्रपूर आंबोली पस भाजपा विजयी मंगला परसराम नन्नावरे
> उस्मानाबाद तालुक्यातील 5 गटांत राष्ट्रवादी विजयी.
> कोलपूरमध्ये राधानगरीतून राष्ट्रवादीचे विनय पाटील विजयी तर काँग्रेसला मोठा धक्का, पी डी धुंदरेंच्या मुलाचा पराभव.
> नाशिक जिल्हा परिषदेत पाटोदा गटात राष्ट्रवादीचे संजय बनकर विजयी.
>कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीच्या शुभांगी शिंदे दानोली गटातून विजयी तर काँग्रेसचे भगवान पाटील तिसंगी गटातून विजयी.
>अहमदनगरमध्ये काँग्रसचे प्रताप शेळके विजयी.
>अमरावतीत भाजपच्या रिता पडोळे यांची बिनविरोध निवड.
>सोलापूरमध्ये भाजपचे किरण मोरे बार्शीत उपळई (ठो) गटातून विजयी, राष्ट्रवादीच्या सतीश पाठक यांचा पराभव.
>पंढरपूरमध्ये  भाजपचे गोपाळ अंकुशराव बिनविरोध विजयी.
>पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या रवी लांडगे यांची बिनविरोध निवड.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...