आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा तर नरेंद्र मोदी व त्यांच्या धोरणांचा पराभव, केजरीवालांना शुभेच्छा- अण्णा हजारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेल्या जोरदार यशानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
केजरीवाल व त्यांच्या टीमने यशाने हुरळून जावू नये. सामान्य लोकांसाठी काम करावे असा सल्ला सल्लाही अण्णांनी आपला दिला आहे.
दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहीर होत आहेत. पहिल्या दोन तासात सर्व जागांचे कल हाती आले आहेत. यात आम आदमी पक्षाने भाजप व काँग्रेसला धोबीपछाड देताना दिल्लीतील 70 जागांपैकी सुमारे 60 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्ष दिल्लीत मोठा विजय मिळविण्याचे पाऊल टाकत आहे. यानंतर अण्णा यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अण्णा म्हणाले, अरविंदने मागील चुका टाळाव्यात, साधेपणाने काम करून जनतेचा विश्वास संपादन करावा. भाजपने लोकांचा विश्वास गमावला आहे. भाजपने फक्त भ्रष्टाचाराबाबत गंभीर असल्याचे दाखवले प्रत्यक्ष काहीच केले नाही. मागील 9 महिन्याच्या कारभारावरून तरी हेच दिसते. एकाही आश्वासनाचे भाजपने पालन केले नाही त्यामुळे त्यांचा दारूण पराभव झाला. किरण बेदींचा यात दोष नाही. हा जनतेचा कौल आहे, जनता हीच सर्वोच्च जनसंवाद आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केले आहे असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
अण्णा पुढे म्हणाले, दिल्लीकर जनतेने योग्य निर्णय घेतला आहे. अरविंदने सत्तेत आले तरी ही सत्ता सामान्यांसाठीची आहे हे विसरू नये. जनतेसाठी आंदोलनाचा लढा त्याने कायम ठेवावा.
आपल्याला माहित असेल की, अण्णा हजारे यांनी येत्या काही दिवसात दिल्लीत भाजप सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयावर अण्णांनी आक्षेप घेतले आहेत. यात भूसंपादन कायदा, लोकपालाची नियुक्ती न करणे, मोदी सरकारने केवळ धनदांडग्यांचे अच्छे दिन आणून शेतकरी हिताच्या विरोधात घेतलेली भूमिका आदी मुद्यांवर अण्णांनी आक्षेप घेत दिल्लीत आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.