आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 व्या मराठी साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ; ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेचे ग्रंथदिंडीत दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाजत गाजत निघाली ग्रंथदिंडी. - Divya Marathi
वाजत गाजत निघाली ग्रंथदिंडी.
पु.भा. भावे साहित्यनगरी (डाेंबिवली) :- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मराठी भाषा, साहित्य अाणि संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डाेंबिवलीत २ फेब्रुवारी (शुक्रवारी) दिमाखदार प्रारंभ झाला. डाेंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात गणेश अाणि ग्रंथपूजन झाल्यावर सकाळी ९ वाजता अाकर्षक  ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. विविध पारंपरिक वेशभूषेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी माेठ्या संख्येने सामील झाल्याने ग्रंथदिंडीने डाेंबिवलीनगरी दुमदुमून गेली. 
  
मावळते अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस, नियाेजित अध्यक्ष डाॅ. अक्षयकुमार काळे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जाेशी, स्वागताध्यक्ष गुलाब वझे अाणि कल्याण- डाेंबिवलीचे महापाैर राजेंद्र देवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश पूजन करण्यात अाले. भारतीय संविधान, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा, डाॅ. अक्षय कुमार काळे यांचे साहित्याचे उर्दू काव्य विश्व, भालचंद्र नेमाडे यांची हिंदू, विंदा करंदीकर यांची अादिमाया, श्रीपाल सबनीस यांचे संमेलनाची अात्मकथा अादी ग्रंथांना पालखीत मानाचे स्थान देण्यात अाले हाेते. सर्वात अग्रभागी पालखी, त्यापाठाेपाठ साहित्य वाचनाची महती सांगणारे १४ िचत्ररथ, जवळपास ५७ शाळांमधील १५ हजार विद्यार्थी, ३७ सामाजिक संस्था, १७५ शिक्षक, छात्रसेना व स्काउटचे साडेपाचशे विद्यार्थी सहभागी झाल्याने गणेश मंदिर ते पु. भा. भावे नगरीपर्यंतच्या संपूर्ण दिंडीच्या मार्गावर  चैतन्याचे वातावरण निर्माण झाले हाेते. 

कवी अशाेक नायगावकर, रामदास फुटाणे, वामन देशपांडे, मेघना साने, अशाेक म्हात्रे, डाॅ. सच्चिदानंद शेवडे, कवी हेमंत राजाराम, अभिनेत्री अश्विनी मुकादम दिंडीत सहभागी झाले हाेते.  रस्त्यावर ठिकठिकाणी काढण्यात अालेल्या संस्कार भारती रांगाेळ्या लक्ष वेधून घेत हाेत्या. गणपती बाप्पा माेरया, विठू नामाचा गजर करीत महिला, विद्यार्थी अाणि साहित्य रसिकांचा सहभाग असलेली ही दिंडी  पावणेअकरा वाजता संमेलनाच्या िठकाणी पाेहोचली. 

पालखीच्या परंपरेत संविधानाचा सन्मान 
संविधानाला समांतर असलेली मूल्यव्यवस्था अाणि तत्त्वज्ञान प्रणाली नव्या समाज रचनेसाठी अावश्यक अाहे. ही मूलभूत व्यवस्था पालखीच्या परंपरेत संविधानाचा सन्मान करून झाली अाहे. सर्व जाती-धर्मांच्या लेखकांचा सन्मान करून मराठी संस्कृती एक असून ती भारतीय संस्कृतीला मार्गदर्शक ठरणारी असल्याचे मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी रा. चिं. ढेरे ग्रंथग्रामचे उद्््घाटन करताना सांगितले. दरम्यान, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जाेशी यांनी संमेलनात ३६५ बूक स्टाॅलची नाेंदणी हाेणे हा विक्रम असल्याचे सांगितले.

माेबाइलचे वेड साेडा पुस्तकाशी नाते जाेडा 
“माेबाइलचे वेड साेडा पुस्तकांशी नाते जाेडा, वाचन करा सुरू कारण ते अाहेत अापले गुरू’, असा संदेश फलक घेऊन शालेय विद्यार्थी माेठ्या संख्येने सामील झाले हाेते. पावणेअकरा वाजता ग्रंथदिंडी संमेलनाच्या ठिकाणी पाेहोचली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जाेशी यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात अाले.   

साहित्याच्या वारीत अवतरले गाडगेबाबा
आषाढी-एकादशीला पंढरपूरची वारी निघते. साहित्य संमेलनदेखील साहित्याची वार्षिक वारी आहे. त्यात सहभागी होण्यासाठी साहित्यिकांनी निमंत्रणाची वाट न बघता सहभागी व्हावे. त्यानंतरच मराठी जागतिक भाषा होईल, असा संदेश मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत सहभागी झालेल्या सोलापूरच्या ‘गाडगेबाबां’नी दिला. हातात झाडू अन् डोक्यावर खापर घातलेले खैराव गावचे   फुलचंद टिळक सगळ्यांचे आकर्षण ठरले. पाणी वाचवा, पाणी अडवा,  बेटी वाचवा, असा संदेश देतानाच मराठी भाषा जागतिक पातळीवर न्यायची असेल तर मराठी टिकवली पाहिजे. आमंत्रणाची वाट न बघता या सहित्याच्या उत्सवात सहभागी झाले पाहिजे. आपण जे लिहितो ते आचरणात आणले पाहिजे, असेही ते म्हणाले. 
   
शेतकरी टिकला तर जग टिकेल
साहित्य संमेलनात ग्रामीण भागातून आलेल्या साहित्यिकांची उपेक्षा होते. त्यांची व्यवस्था करणे संयोजकांची जबाबदारी आहे.  ग्रामीण भागातून दरवर्षी १०० पेक्षा जास्त साहित्यिक संमेलनासाठी येतात. गेल्या १० वर्षांपासून साहित्य संमेलनात गाडगेबाबा होऊन येणारे टिळक स्वतः लेखक आहेत. डाेंबिवलीकर व उपस्थित रसिकांना त्यांची वेशभूषा अाकर्षित करत हाेती. 

नायगावकरांची कविता 
पारसमणी चाैकात कवी अशाेक नायगावकर हे ग्रंथदिंडीत सहभागी झाले अाणि त्यांनी अचानक कविता सुरू केली. सर्वत्र स्वाक्षरी मराठीत करा, घरी दारी मराठीत बाेला, सुटावा पापुद्रा मराठीचा या कवितेला सर्वांनीच दाद दिली. या वेळी पुण्याचे मिलिंद जाेशी, प्रकाश पायगुडे, साेलापूरचे जयंत कुलकर्णी, चाळीसगावचे  तानाजी जगताप, भाेपाळचे सुधाकर भाले यांची विशेष उपस्थिती हाेती.  

क्षणचित्रे
> नववारी साड्या अाणि डाेक्यावर फेटा घातलेल्या बुलेटस्वार महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधले.  
> चार लेझिम अाणि  ढाेलपथकांच्या वाद्यांमुळे संपूर्ण दिंडीमध्ये उत्साह निर्माण झाला हाेता.
> माेबाईलचे वेड साेडा पुस्तकांशी नाते जाेडा, वाचन करा सुरू कारण ते अाहेत अापले गुरु असा संदेश फलक घेऊन शालेय विद्यार्थी माेठ्या संख्येने सामील झाले हाेते. 
> पावणे अकरा वाजता ग्रंथ दिंडी समेलनाच्या ठिकाणी पाेंहचली. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जाेशी यांच्याहस्ते ध्वजाराेहण करण्यात अाले.

साहित्यिकांचा सहभाग
पुण्याचे मिलिंद जाेशी, प्रकाश पायगुडे, साेलापूरचे जयंत कुलकर्णी, चाळीसगावचे  तानाजी जगताप, भाेपाळचे सुधाकर भाले यांनी दिंडीत विशेष उपस्थिती हाेती
 
संविधानाचा सन्मान 
संविधानाला समांतर असलेली मूल्यव्यवस्था आणि तत्वज्ञान प्रणाली नव्या समाज रचनेसाठी अावश्यक अाहे. ही मूलभूत व्यवस्था पालखीच्या परंपरेत संविधानाचा सन्मान करून झाली अाहे. सर्व जाती धर्माच्या लेखकांचा सन्मानित करून मराठी संस्कृती एक असून ती भारतीय संस्कृतीचाला मार्गदर्शक ठरणारी असल्याचे मत मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी रा.चिं. ढेरे ग्रंथग्रामचे उद्घाटन करताना केले.

विश्वाच्या शांततेसाठी अाणि विकासासाठी भारतीय संस्कृती, ज्ञान, परंपरा ही निर्णायक महत्वाची असून ते या पालखीतून सिद्ध झाले असे सांगून सबनीस यांनी वाचक वाचला तर मराठी संस्कृती जगेल अाणि मराठी संस्कृती जगली तर भारतीय संस्कृतीला मार्गदर्शन मिळेल असे मत व्यक्त केले. सहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जाेशी यांनी संमेलनात २६५ बूक स्टाॅलची नाेंदणी हाेणे हा एक विक्रम आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्रंथदिंडीचे आणखी काही PHOTOS.. अखेरच्या स्लाइडवर पाहा Video..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...