आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाच्या ठिबकसाठी दाेन टक्के दराने कर्ज; शेतकऱ्यांना हेक्टरी 85 हजार रुपये कर्ज मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बारमाही पीक असलेल्या उसाला प्रचंड पाणी लागत असल्याने मराठवाड्यासह अनेक भागात भूजल पातळी घटून दुष्काळाचे चटके सहन करावे लागले. हे प्रकार टाळण्यासाठी राज्यात ऊस पीक सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला अाहे. उसाच्या शेतीत ठिबक सिंचनाची साेय करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ८५ हजार रुपयांचे कर्ज केवळ २ % दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात अाला. या याेजनेसाठी राज्यात आठ ठिकाणी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हे प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात सूक्ष्म सिंचनाचे प्रकल्प राबवण्यात येतील, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 

या अाठ ठिकाणी ठिबकची सक्ती
राज्यात टेंभू उपसा योजना, भीमा (उजनी), मुळा, निम्न मानार, हतनूर, ऊर्ध्व पूस, कान्होळी नाला (नागपूर) आणि आंबोली (सिंधुदुर्ग) या आठ ठिकाणी पथदर्शक प्रकल्प राबवण्यात येणार अाहे. या आठही ठिकाणांवरील बारमाही पिकांना सिंचनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा पुढील वर्षीच्या जूनपर्यंत अवलंब करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर अन्य प्रकल्पांवर सूक्ष्म सिंचनाची सक्ती केली जाईल.

ठिबकचा निर्णय योग्य
१९९९ च्या अहवालात उसाला ठिबक सक्तीची शिफारस केली होती. सरकारचे पाऊल स्वागतार्ह अाहे. यामुळे पाण्याची ५० टक्क्यांपेक्षा जास्त बचत होईल. ठिबकद्वारे खते ही देता येत असल्याने योग्य मात्रा मिळेल. 
- डॉ. माधवराव चितळे, जलतज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...