आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या कर्जमाफीत परप्रांतियांची घुसखोरी; यूपी, गुजरातसह कर्नाटकी शेतकऱ्यांचे अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊत राहणाऱ्या दोन, रायबरेली आणि प्रतापगढमध्ये राहणारे प्रत्येकी एक आणि गुजरात, कर्नाटक, तेलंगणामधील ७ ते १० शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे. - Divya Marathi
लखनऊत राहणाऱ्या दोन, रायबरेली आणि प्रतापगढमध्ये राहणारे प्रत्येकी एक आणि गुजरात, कर्नाटक, तेलंगणामधील ७ ते १० शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे.
मुंबई- महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले. कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी सुमारे ४७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, अर्ज करणाऱ्यांत उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांचा समावेश आहेत. तसेच मुंबईतूनही १४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून अनेक अटीही काढून टाकण्यात आल्या.  मात्र, मागील कर्जमाफीप्रमाणे बँकांचा फायदा न होता शेतकऱ्यांना खरोखर कर्जमुक्त करता यावे यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले. अर्जासोबत आधार कार्डचा क्रमांकही देणे बंधनकारक केले. या आधार कार्डमुळेच चकित करणारी आकडेवारी समोर आली आहे.

मागील कर्जमाफीच्या वेळी मुंबईतील ८२३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. मुंबईत शेतकरी असल्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. मुंबईतील शेतकऱ्यांची यादी तपासली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. असे असले तरी या वेळी मुंबईतील जवळजवळ १४ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केल्याचे दिसून येत आहे. 
 
पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी : देशमुख
राज्य सरकार प्रत्येक अर्जाची कठोरतेने छाननी करणार असून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.
 
१५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी, पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी ३० सप्टेंबर रोजी
लखनऊत राहणाऱ्या दोन, रायबरेली आणि प्रतापगढमध्ये राहणारे प्रत्येकी एक आणि गुजरात, कर्नाटक, तेलंगणामधील ७ ते १० शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे. सध्या फक्त अर्जाची नोंदणी केली जात असून १५ सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी होणार आहे. राज्य सरकार एकूण तीन याद्या जाहीर करणार असून एक यादी पात्र शेतकऱ्यांची असेल, एक अपात्र आणि एक अशा शेतकऱ्यांची यादी ज्यांची कागदपत्रे तपासण्याची आवश्यकता आहे. पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी ३० सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल. त्यानंतर अर्जांची छाननी करून दुसरी यादी जाहीर केली जाईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

आयटी विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी आलेल्या अर्जांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांनीही कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...