आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन कर्जमाफी अर्जाची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत, ऑक्‍टोबरपासून खात्‍यात जमा होणार रक्‍कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५ सप्टेंबर अर्जासाठी मुदत राहील. १ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी  मंगळवारी दिली.

कर्जमाफी अंमलबजावणीसाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक मंगळवारी झाली.  त्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.  

ई-सुविधा केंद्रांवरील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही केंद्रांवर शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे आकारण्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत संबधित ई-सेवा केंद्रांवर कारवाई करावी आणि बंद असलेली केंद्र तात्काळ सुरू करावीत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले.
 
२२ लाखांवर नोंदणी
- २२ ऑगस्टपर्यंत २२ लाख ४०,९४३ शेतकऱ्यांची नोंदणी.
- १८ लाख ८५,४५७ ऑनलाइन अर्ज सरकारला मिळाले.
- शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत जवळच्या ई -सुविधा केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरावेत.
बातम्या आणखी आहेत...