आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Court Slams To Writer Anand Yadav & Publisher Sunil Mehta

आनंद यादवांची \'ती\' दोन पुस्तके फाडून टाका- कोर्टाचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांनी लिहलेल्या 'संतसूर्य तुकाराम' आणि 'लोकसखा ज्ञानेश्वर' या दोन पुस्तके फाडून टाकावीत असे आदेश शिवाजीनगर येथील स्थानिक कोर्टाने दिले आहेत. याचबरोबर लेखक आनंद यादव व प्रकाशक सुनील मेहता यांना प्रत्येकी 20 हजारांचा दंड करण्यात आला आहे.
आनंद यादव लिखीत संतसूर्य तुकाराम आणि लोकसखा ज्ञानेश्वर या पुस्तकाद्वारे दोन महान संतांची बदनामी झाल्याचा दावा तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंह मोरे यांनी केला होता. याचबरोबर याप्रकरणी 2009 साली मोरे यांनी कोर्टात दावा दाखल केला होता. त्यानंतर संबंधित कोर्टाने लेखक यादव आणि प्रकाशक मेहता यांनी पुस्तकातल्या मजकुराबाबत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र या दोघांना कोणतेही पुरावे सादर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कोर्टाने मोरे यांची बाजू घेत संबंधित दोन्ही पुस्तके फाडून टाकावीत असे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे, कोर्टाच्या या निर्णयाबाबत मोरे यांनी समाधान व्यक्त केले आहे तर, या पुस्तकाचे प्रकाशक सुनील मेहता यांनी सत्र न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.