आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसईच्या मच्छिमारांनी पकडला 10 फुट लांब 300 किलोचा शार्क, किंमत 22000, बघ्यांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वसई कोळिवाडा मासळी मार्केटमध्ये काल बघ्यांची तुफान गर्दी उसळली होती. येथील मच्छिमारांनी तब्बल 10 फूट लांब, 300 किलो वजनाचा व्हाईट टायगर शार्क समुद्रातून पकडून आणला होता. त्यानंतर शार्कसोबत सेल्फी घेण्यासाठी उत्साही नागरिकांची झुंबड उडाली. त्यानंतर तब्बल 22 हजार रुपयांना हा शार्क विकण्यात आला.
यासंदर्भात एका मच्छिमाराने सांगितले, की यापूर्वी आम्ही मुंबई आणि वसईच्या मच्छिमार्केटमध्ये एवढा मोठा मासा बघितलेला नाही. गुजरातच्या सीमेजवळ मच्छिमारांनी याची शिकार केली. शार्क प्रेगनंट होता. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने दोन पिलांना जन्म दिला. पण शिकारीत तो मारला गेला.
येथील हमाल वसिम खान यांनी सांगितले, की माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकढा मोठा मासा बघितला नाही. सायंकाळच्या सुमारास मार्केटमध्ये हा मासा आणण्यात आला. 22 हजार रुपयांना तो विकण्यात आला.
वन्यजीव प्रेमिंचा मात्र विरोध
PAWS या संस्थेचे संस्थापक निलेश भांगे म्हणाले, की शार्कच्या शिकारीवर बंदी आहे. भरकटून समुद्र किनारी जर शार्क आले असतील त्यांना समुद्रात सोडण्यासाठी वनविभागाने पुढे आले पाहिजे. मृतावस्थेत सापडले म्हणून त्यांचा खाण्यासाठी उपयोग केला जाऊ नये.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, वसईच्या मार्केटमध्ये आणलेल्या शार्कचे फोटो.... लोकांनी असे काढले सेल्फी....
बातम्या आणखी आहेत...