आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local From VT To Bhandup To Support Saurabh, Who Sings In Locals For Charity To Cancer .. Sang With Him ..

महानायक अमिताभ यांचा मुंबईत चक्क 'लोकल'ने प्रवास, सेल्फीसाठी झुंबड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांनी रविवारी पहाटे चक्क लोकलने प्रवास केला. प्रवाशांचे मनोरंजन करत कर्करुग्णांसाठी मदत गोळा करणा-या सौरभ सिंग या ‘रिअल हीरो’ची महानायकाने प्रत्यक्ष भेट घेऊन त्याच्याबरोबर सीएसटी ते भांडुप असा प्रवास केला. निमित्त होते ‘आज की रात है जिंदगी’या टीव्ही शोच्या प्रचाराचे. मात्र, सुपरस्टार अमिताभ यांना आपल्या डब्यात प्रत्यक्ष पाहून सर्वसामान्य चाकरमान्यांची नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. मग काय सर्वांचेच मोबाईल हातात दिसू लागले व पिक्चर्स, सेल्फीसाठी क्लिक होऊ लागले.
इतरांच्या कल्याणासाठी निःस्वार्थपणे कार्य करणा-या अनेक व्यक्ती समाजात आहेत. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावे अशा हेतूने सुरू झालेल्या ‘आज की रात है जिंदगी’ या टीव्ही शोच्या प्रचारासाठी पहाटेच्या सुमारास अमिताभ आणि या टीव्ही शोमधील त्यांचा सहकलाकार हुसैन कुवाजेरवाला यांनी लोकल पकडली. अमिताभ यांच्यासमवेत सौरभ सिंग प्रवास करत होता. गिटार वाजवून गाणी म्हणत प्रवाशांमध्ये फिरणारा सौरभ त्यातून मिळणारे पैसे कर्करुग्णांच्या उपचारासाठी देतो. एका चांगल्या कार्यासाठी भरगर्दीत मदत जमा करणार्‍या सौरभच्या बाजूला बसून अमिताभ यांनी त्याच्या सुरात सूर मिसळला. लोकलमधील सहप्रवाशांनीही त्याला टाळ्यांच्या गजरात साथ दिली. इतरांच्या चेह-यावर हसू फुलवण्याचे व्रत घेतलेल्या सौरभच्या कार्याचे बिग बींनी ‘आय सॅल्यूट यू’ अशा शब्दांत कौतुक केले. एवढेच नव्हे तर त्याच्या या कार्याला हातभार लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सेल्फी, पिक्चर्स अन् टाळ्यांचा कडकडाट अमिताभ यांचा हा सरप्राइज करणारा प्रवास अनेकांच्या मोबाईलमध्ये कैद होऊन सोशल नेटवर्किंग साइटवर फोटो, व्हिडीओच्या रूपात अपलोड झाला. खुद्द अमिताभ यांनीही आपल्या ट्विटरवर त्याला रिस्पॉन्स दिला. समाजासाठी भरपूर काही करणार्‍या सौरभसारख्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे आणि त्यांना सहकार्यही केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे पाहा, बच्चन यांच्या सीएसटी ते भांडूप प्रवासादरम्यानची क्षणचित्रे....