आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकल चक्क प्लॅटफॉर्मवर चढली, पाच जण जखमी; तिघे निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकात रविवारी शंटिंगच्या वेळी एक लोकल चक्क थेट प्लॅटफॉर्मवरच चढली. या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले आहेत. तसेच लोकल गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने रविवारी सुटीचा दिवस असल्याने स्थानकात फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
चर्चगेट स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर हा अपघात झाला. दरम्यान, ही घटना तांत्रिक कारणामुळे झाली नसल्याचा निष्कर्ष रेल्वे खात्याने काढला असून मानवी चुकांसाठी माेटारमन, गार्ड व लाेकाे इन्स्पेक्टरला निलंबित केले अाहे.

भाईंदरहून सकाळी ११:२५ ला चर्चगेटसाठी जलद लोकल सुटली. मरिन ड्राईव्हपर्यत या लोकलने व्यवस्थित प्रवास केला. मात्र पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्टेशन असलेल्या चर्चगेट स्टेशनात (डेड एन्ड) मात्र मोटारमनला ती थांबवता आली नाही. गाडीवरील ताबा जाऊन पहिला डबा थेट डेड एन्डची भिंत तोडून स्टेशनात घुसला.
दुपारी सव्वाबारा वाजता झालेल्या या अपघातामध्ये तीन महिला आणि दोन पुरुष जखमी झाले आहेत. मोटारमन एल. एस. ितवारी आणि गार्ड अजय गोहील सुरक्षित आहेत. चर्चगेट अाणि सीएसटी ही पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील दोन डेड एन्ड आहेत. इथे आजपर्यंत असा अपघात कधीच झालेला नाही.
बातम्या आणखी आहेत...