आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकल तिकिटांसाठी मंत्रालयात एटीव्हीएम; मध्य रेल्वेचा देशातील पहिली सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंत्रालयात दररोज येणा-या हजारो नागरिकांसाठी मध्य रेल्वेने मंत्रालयातच एटीव्हीएम मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथेच उपनगरीय गाड्यांचे तिकीट काढणे शक्य होणार आहे.


दादर, सीएसटी, ठाणे, कुर्ला अशा मुख्य स्थानकांवर तिकिटांसाठी प्रचंड गर्दी असते. तिकिटांच्या रांगेमध्ये नागरिकांचा खूप वेळ जातो. तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी व्हावी म्हणून एटीव्हीएम मशीन्सही जवळजवळ सर्वच स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. मंत्रालयात रोज हजारो नागरिक वेगवेगळ्या कामांसाठी येतात. काही मुंबईबाहेरील नागरिकही असतात. त्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. यानंतर सरकारी, निमसरकारी व खासगी कार्यालयांत एटीव्हीएम मशीन बसवण्याचा रेल्वेचा विचार आहे.