आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीसीसीआयचे सर्व अधिकारी बडतर्फ करा : लोढा समिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्ले यांची बीसीसीआय पारदर्शी कारभारासाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करावी, अशी विनंती लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली. करारांचे वितरण, स्थानिक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा व आयपीएल स्पर्धा आयोजित करणे आणि कारभारात पारदर्शीपणा आणणे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या निरीक्षकाची नियुक्ती करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशींची अंमलबजावणी न करणाऱ्या बीसीसीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणीही लोढा समितीने केली आहे.

पिल्ले यांना अंतर्गत हिशेब तपासनीस नेमण्याचे तसेच बीसीसीआय प्रशासनाला मार्गदर्शनाचे अधिकार द्यावेत, अशीही मागणी लोढा समितीने केली. समितीच्या या मागणीमुळे बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह दिग्गजांचे पद धोक्यात आले. ७० वर्षांवरील सर्व पदाधिकारी, मंत्री, सरकारी नोकर, अन्य क्रीडा संघटनांवर पद भूषविणारे, ९ वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या व फौजदारी गुन्ह्याचे आरोप असणाऱ्यांना पदावरून हटविण्याची मागणी आहे.

आजवर ९ शिफारशी मान्य : बीसीसीआयने आतापर्यंत लोढा समितीच्या ९ शिफारशी मान्य केल्या आहेत. यात अॅपेक्स काैन्सिल बनवणे, अॅपेक्स काैन्सिलमध्ये सीएजी सदस्य असणे, खेळाडूंची संघटना बनवणे आदी ९ शिफारशींचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...