आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Polls 2014: Bollywood Seeks Change In Political System

फिल्मी तार्‍यांनाही हवाय बदल; केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपेरी पडद्यावर आपल्या काल्पनिक पात्रांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बॉलीवूड कलाकारही यंदाच्या निवडणुकांकडे डोळे लावून आहेत. त्या अनुषंगाने अभिनेत्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क तर बजावलाच. सोबतच लोकांनी मतदान करावे यासाठीही जनजागृती केली.

सध्याचे सरकार हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार हा सुरूच आहे. त्यामुळे देशात सत्तांतर होणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केलेय. सध्या एका स्थिर आणि शक्तिशाली सरकारची गरज आहे. सरकारने महागाई, अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादासारख्या मुद्यांचा गांभीर्याने विचार करावा. देशाचे परराष्ट्र धोरण ठोस असायला हवे. सेलिब्रिटी असल्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील करप्रणालीमध्ये काही बदल अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

सुपरस्टार शाहरुख खाननेही सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. देशात सगळीकडे शांततेचे वातावरण हवे, असे सगळ्यांनाच वाटते, असे मतही त्याने व्यक्त केले, तर देशाच्या राजकीय परिस्थितीत बदल होणे अत्यंत गरजेचे असल्याचे दीपिका पदुकोन म्हणाली. बहुतांश लोकांनाही हा बदल अपेक्षित आहे. जेव्हा मतदानाची वेळ येते त्या वेळी सगळे मोठमोठी आश्वासने देतात. या वेळी तरुण मोठ्या संख्येने मतदान करतील अशी मला अपेक्षा आहे. अशा अनेक समस्या आहेत, ज्या दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मी मतदानानंतरच आयफा सोहळ्यासाठी रवाना होणार आहे, असेही तिने सांगितले. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने भ्रष्टाचारमुक्त भारताच्या संकल्पनेचे समर्थन केले. भ्रष्टाचारामुळे आज प्रत्येक जण त्रस्त आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळेही जनसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे मला बेटर आणि क्लीन भारताची अपेक्षा आहे. सच्चे भारतीय असल्याने आपल्याला बदल अपेक्षित असल्याचेही ती म्हणाली. सामाजिक आणि राजकीय विषयांवर चित्रपट बनवणार्‍या प्रकाश झा यांनी आज देशाला मॉडर्न गांधीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

- देशाच्या राजकीय परिस्थितीत बदल गरजेचा आहे. राजकीय नेते करत असलेली आश्वासने पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.
दीपिका पदुकोन

- सगळ्यांना सौहार्दपूर्ण वातावरणात राहण्याची इच्छा असते. जनता अत्यंत बुद्धिमान आहे. कोणाला मत द्यायचे व कोणाला नाही हे त्यांनी आधीच ठरवले आहे.- शाहरुख खान