आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज झाला होता D Gang च्या या गॅंगस्टरचा encounter; त्या घटनेवर नंतर बनला चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माया डोळस. - Divya Marathi
माया डोळस.

मुंबई- मायानगरी आणि स्वप्ननगरी म्हणून अनेक जण मुंबईला पाहतात. या मुंबईची टोळीयूध्द ही एक काळी बाजू आहे. या विश्वाची भूरळ अनेकांना पडते. 16 नोव्हेंबर 1991 हा दिवस अनेक मुंबईकर आजही विसरलेले नाहीत. याच दिवशी लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये एक encounter घडले याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या स्मरणात आहेत. 

 

 

तसा हा दिवस नेहमीसारखाच उगवला होता पण आज लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये काहीतरी वेगळे घडत होते. याची कल्पना तेथील रहिवाशांना तेव्हा आली जेव्हा त्यांनी राज्य राखीव दलाचे पोलिस कमांडो पाहिले. तेथे युनिफॉर्ममधल्या आणि साध्या वेषातल्या मंडळींचा वावरही वाढला होता. ते सगळे एकाच दिशेने चालले होते. ते ठिकाण होते स्वाती नावाची इमारत. पोलिसांना आत शरताच एक जीप आणि मारुती कार दिसली. यातील एका गाडीचे रजिस्ट्रेशन गुजरातमधले होते तर एका गाडीचे मध्य प्रदेशातले होते. पोलिसांना खात्री झाली होती की या ठिकाणी आपले सावज लपले आहे. 

 

 

पोलिस अधिकारी ए. ए. खान यांनी अधिकाऱ्यांना, कमांडोजना त्यांच्या जागा आखून दिल्या. आता अॅक्शनची वेळ होती. दुसऱ्या मजल्यावर D gang चा माया डोळस आणि त्याचे साथीदार लपले होते, याची माहिती होती. अनेक मर्डर, खंडणीची प्रकरणे त्याच्या नावावर होती. मोस्ट वॉन्डेट माया जवळ पोलिस पोहचले होते. एका केससाठी त्याला मुंबईत आणलं जात असताना माया डोळसने यशस्वी पलायन केले होते. तब्बल 96 दिवस तो पोलिसांपासून लपून होता आणि माया डोळस याच बिल्डिंगमध्ये आहे आणि तिथूनच खंडणीसाठी धमक्या देत आहे, अशी पक्की माहिती पोलिसांकडे होती.

 

पोलिसांनी सर्व रहिवाशांना घराचे दरवाजे बंद करून घेण्याच्या सूचना दिल्या. कोणाला फोनही करू नका, असे सांगितले. माया डोळसला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला रिस्पॉन्सही लगेच मिळाला तो म्हणजे पलिकडून फायरिंग झाली. माया नेमका कुठे आहे, याचा पोलिसांना अंदाज आला. त्यानंतर कमांडो पुढे सरसावले. त्यानंतरही खान यांनी  'हथियार नीचे डालके सरेंडर हो जाओ, हम तुम्हे नही मारेंगे' असे त्याला सांगितले. शिरलेल्या कमांडोज आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या गेल्याचे लक्षात येताच खान आणि इन्स्पेक्टर जयसिंग पाटील यांनी मायाला दहा आकड्यांचा वेळ दिला. दहा म्हणून होईपर्यंत शरण न आल्यास आम्हाला सर्वांना आत शिरावे लागेल आणि मग काय होईल, ते सांगता येणार नाही, असा इशारा देण्यात आला.

 

 

माया डोळस काही न ऐकता पोलिसांवर गोळ्या चालवण्याचे आदेश आपल्या साथीदारांना देत होता. एका क्षणी फ्लॅटच्या बाहेरून गोळ्या झाडल्या आहेत, हे लक्षात आल्यावर कमांडोज थेट गच्चीवर गेले आणि तिथून त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. ते खाली येत असल्याचे पाहून त्यांच्यावर जिन्यातून गोळ्या झाडल्या गेल्या. बुलेटप्रुफ जॅकेटमुळे ते बचावले. पण त्यांनी गोळ्या झाडणाऱ्या दोघांना ठार केले. अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडला. तो तोडताच माया डोळसने एके-17 रायफल उगारली. पण तो गोळीबार सुरू करणार, इतक्यात पोलिसांनी त्यांच्यावर फायरिंग केले. मायाचा खात्मा झाला होता आणि लोखंडवाला शूटआऊट पूर्ण झाले होते. या घटनेत D gang च्या 7 जणांना यमसदनी पाठवण्यात आले होते.

 

पुढील स्लाईडवर या घटनेशी संबधित आणखी फोटो आणि माहिती

 

 

 

बातम्या आणखी आहेत...