आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election : Congress Election Symbol Printed On Congress

लोकसभा निवडणूक: शंभरच्या नोटांवर काँग्रेसचा पंजा असल्याचे स्पष्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच मुंबईत काही शंभरांच्या नोटांवर काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हाताच्या पंजाचे छापे मारल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान हे छापे मारण्यात आले असावेत, असा संशय व्यक्त होत आहे.
मुंबईतील टॅक्सीचालक प्रकाश यरपाळे यांना एका महिलेने भाड्यापोटी शंभरची नोट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला यरपाळे यांनी महिलेला नोट बदलून देण्यास सांगितले. त्यावर तिनेही नोट बदलण्यास होकार दिला. मात्र, नंतर निर्णय बदलून मी ती नोट संबंधित महिलेकडून घेतली व नंतर पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे यरपाळे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या पालिका निवडणुकीदरम्यान या नोटांवर छापे मारण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकाराबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष र्जनादन चांदूरकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी व्यस्ततेचे कारण देत बोलण्यास नकार दिला. दरम्यान, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सदस्य निझामुद्दीन रियान यांनी मात्र असे घडले नसल्याची प्रतिक्रिया दिली.
हा ‘आरबीआय’चा अपमान
नोटांवर असे छापे मारून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अपमान झाला आहे. त्यामुळे दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अब्दुल कदीर चौधरी यांनी केली आहे.