आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election In Nagpur Consituency On 10 Th April

पटेल, वासनीक, गडकरींची प्रतिष्ठा पणाला; विदर्भात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भात निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजता थंडावल्या. असे असले तरी पुढील दोन दिवस गुप्त बैठकांचा जोर वाढेल. प्रचार थांबताच सार्वजनिक ठिकाणावरील बॅनर, पोस्टर उतरविण्यात येतील. विदर्भातील लोकसभेच्या सर्व 10 जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. विदर्भातील बहुतेक लढती अटीतटीच्या होणार असल्याचे चित्र आहे. नागपूरमधून सात वेळा खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार, पहिल्यांदाच लोकसभा निवडणुक लढवित असलेले भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भंडारा-गोंदियातून प्रफुल्ल पटेल तर रामटेकमधून मुकूल वासनीक यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर अशा 10 लोकसभा जागांसाठीचा आज सायंकाळी प्रचार थांबला. याचबरोबर आज सायंकाळपासून पुढील तीन दिवस (10 एप्रिल सायंकाळी 7 पर्यंत) राज्यात निवडणूक आयोगाने ड्राय डे घोषित केला आहे. निवडणुका खुल्या, भयमुक्त, निर्भय व प्रलोबनमुक्त व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग मतदानाच्या अगोदर 48 तास संबंधित लोकसभा मतदारसंघात ड्राय डे घोषित करते. त्यामुळे पुढील दोन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
विदर्भातील 10 पैकी तीन लढतीकडे सा-या देशाचे लक्ष आहे. त्यातील एक आहे नागपूरमधील. नागपूर लोकसभा मतदारसंघातून 33 उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. यात भाजपचे नितीन गडकरी व खासदार विलास मुत्तेमवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सात वेळा खासदार राहिलेले मुत्तेमवार अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा संसदेत जाणार की प्रथमच निवडणूक लढविणारे गडकरी पहिल्याच झटक्यात संसदेत जाणार याकडे लक्ष आहे. गडकरींनी आपला विजय सुकर व्हावा यासाठी सर्व बाजूने जोरदार प्रयत्न केले आहेत. प्रचारातही त्यांनी आघाडी घेतल्याचे आहे. संपूर्ण मतदारसंघातून त्यांनी गडकरींनी तीन फे-या पूर्ण केल्या आहेत. याचबरोबर बड्या नेत्यांसह सेलिब्रेटीनींही गडकरींच्या प्रचाराला हजेरी लावली आहे.
यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमनसिंह, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, उमा भारती, बलवीर पुंज, नवज्योतसिंग सिद्धू, विजय गोयल, रामविलास पासवान, रामदास आठवले, उदितराज, नजमा हेपतुल्ला, एम जे अकबर, शाहनवाज हुसैन आदी दलित, मुस्लिम नेत्यांना प्रचाराला बोलवून आपण सर्वसमावेशक चेहरा असल्याचे भासविण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. नागपूरमध्ये दलित व मुस्लिमांची मोठी मते आहेत. तसेच ही मते गडकरींना मिळतील असे बोलले जात आहे. याचबरोबर आधात्मिक क्षेत्रातील श्री श्री रविशंकर, योगगुरु बाबा रामदेव, सतपाल महाराज यांना आणून या वर्गालाही जोडण्याचे काम गडकरींनी केले आहे. हेमामालिनी, स्मृती इराणी, वाणी त्रिपाठी, नेहा पेंडसे, विवेक ओबेरॉय यांना प्रचाराला आणून गडकरींनी सामान्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गडकरींसाठी मागील महिन्याभरात वेगवेगळ्या ठिकाणी, गावांत 150 पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत त्यामुळे प्रचारात तरी मुत्तेमवारांपेक्षा गडकरींनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
विलास मुत्तेमवारांचा रस्त्यांवर प्रचार दिसून आला नसला तरी संघटनात्मक पातळीवर त्यांनी लक्ष दिले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी शरद पवारांसह कलमना भागात मुत्तेमवारांसाठी सभा घेतली. याशिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार दिवस नागपूरात तळ ठोकला होता. सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, नितीन राऊत या स्थानिक व दलित-मुस्लिम नेत्यांनी प्रचाराचे काम पाहिल्याने काँग्रेसची पारंपारिक दलित-मुस्लिम मते फुटणार नाहीत याची काळजी घेतना दिसत आहेत. याचबरोबर आपच्या अंजली दमानिया यांना एका वर्गाचा प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे आव्हान सध्या तरी दिसत नाही मात्र त्यांना मिळणारी मते गडकरींच्या फायद्याची ठरतात की मुत्तेमवारांच्या ते 16 मेला कळणार आहे.
पुढे वाचा, वासनीक आणि पटेल यांची प्रतिष्ठा पणाला...