आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election Praparation: Kawade Group Stand Its Egith Candidate

लोकसभेची तयारी: कवाडे गट आठ जागा लढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पीपल्स रिपब्लिकन पार्टी लोकसभेच्या 8 आणि विधानसभेच्या 54 जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. समविचारी पक्षांशी युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यास यश न आल्यास स्वबळावर निवडणुका लढवण्याचा पक्षाचा विचार असल्याचे कवाडे म्हणाले.


बिहारमधील बोधगया मंदिरात ज्या सनातनी प्रवृत्तींनी स्फोट घडवले त्याच प्रवृत्तींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला आहे. बोधगया स्फोटाप्रमाणेच दाभोलकर यांच्या हत्येचाही तपास लागणार नाही, असे भाकितही त्यांनी वर्तवले.


रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले महायुतीमधून बाहेर पडले तरी त्यांना आंबेडकरी समाजाची सहानुभूती मिळणार नाही. आम्ही लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ निश्चित केले असून ‘पीआरपी’ची काँग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्यता कवाडे यांनी वर्तवली. माध्यमांनी देशात तयार केलेला ‘मोदी फिवर’चा फुगा देशातील जनताच फोडेल. दलितांची मते मोदींच्या पारड्यात कदापि पडणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.