आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे \'आमची मुंबई\' पण स्वातंत्र्याआधीची; रस्त्यावर दौडायचे घोडे अन् बैलगाड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताज हॉटेलबाहेर उभा असलेला टांगा. - Divya Marathi
ताज हॉटेलबाहेर उभा असलेला टांगा.
मुंबई - जिवाची मुंबई, आमची मुंबई असे कित्येक वाक्प्रचार या चंदेरी-रूपेरी शहराच्या नावाने रूढ आहेत. जो-तो मुंबईवर 'भरवसा' ठेवून या शहरात नशीब आजमावत असतो. तथापि, भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षांत देशात सर्व बाजूंनी बदल झाले आहेत. पण फक्त मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास आज हे शहर डेव्हलपमेंट आणि लाइफस्टाइलसाठी जगभरात प्रसिद्ध झाले आहे. पण नव्या पिढीला स्वातंत्र्याआधीची मुंबई कशी होती हे कदाचित माहिती नसेल. म्हणून स्वातंत्र्याच्या या उत्सवात आम्ही दाखवत आहोत 70 वर्षे जुन्या मुंबईला. एका अमेरिकी फिल्म मेकरने मुंबईवर 83 वर्षांआधी बनवलेली डॉक्युमेंट्री येथे दाखवत आहोत.
 
व्हिडिओत आहे हे खास...
 - गेट वे टू इंडिया नावाच्या या शॉर्ट फिल्मला अमेरिकी फिल्म निर्माता जेम्स ए. फिट्ज पेट्रिकने 1930-32 दरम्यान चित्रित केले होते. त्या वेळी या फिल्मला आवाजही पेट्रिक यांनीच दिला.
 - या फिल्ममध्ये 1932 मधील मुंबई आणि आसपासचा परिसर चित्रित करण्यात आला आहे. 8 मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्ये मुंबईत राहणारे लोक, रस्ते, बाजार, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि कल्चर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 - 1932 मध्ये शहराची लोकसंख्या जेमतेम 10 लाख होती. त्या काळी मुंबईच्या रस्त्यांवर एखाद-दुसरी मोटारगाडी (कार) चालायची. वाहतुकीच्या नावावर बहुतांश बैलगाड्या आणि घोडागाड्यांचा वापर व्हायचा. 
 - डाक्युमेंट्रीत मुंबईचे फेमस महालक्ष्मी रेसकोर्स, पक्ष्यांच्या करामती दाखवणारे कलाकार, मच्छीमारांचे एक गाव, तसेच गावातील महिलांनाही दर्शवण्यात आले आहे.
 - त्या काळच्या मुंबईची दृश्ये, रस्त्यावर अंबारीसह चालणारा हत्ती, समुद्रकिनारा आणि जुहू बीचही दाख्वण्यात आले आहे.
 
कसे पडले मुंबई नाव?
 - मुंबईचा इतिहास पुरातन काळाशी जोडलेला आहे. दुर्गामातेचे रूप असलेल्या मुंबा देवीच्या नावावरून मुंबई हे नाव पडले.
 - मुंबई नावातील पहिले दोन अक्षर मुंबा वा महा-अंबा देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहेत. तर शेवटचा शब्द म्हणजे "आई" मधला ई, असे मुंबई नाव तयार झाले.
 - अधिकृतरीत्या 1995 मध्ये पहिल्यांदा हे नाव स्वीकारले गेले.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, मुंबईचे आणखी काही फोटोज आणि 1932ची मुंबईवरील डॉक्युमेंट्री
 
बातम्या आणखी आहेत...