आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिश्रा कुटुंबियाला कुंभमेळ्याला जाणे पडले महागात; मुंबईत 80 लाखांची घरफोडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील मूळच्या एका उत्तर भारतीय कुटुंबाला अलाहाबादमधील कुंभमेळ्याला जाणे चांगलेच महागात पडले आहे. बोरीवलीतील गोराई परिसरातील ही घटना असून, त्यात सुमारे दोन किलो सोन्यासह रोख साडेसहा लाख रुपयांची घरफोडी झाल्याचे पुढे आले आहे. रोख रक्कम व सोन्याची अंदाजित किंमत सुमारे 80 लाखांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

शिवमणी मिश्रा असे घर फोडलेल्या मालकाचे नाव आहे. शिवमनी आपल्या कुटुंबियांसह कुंभमेळ्याला गेले होते. त्याच काळात त्यांच्या बंगल्यावर काही जणांनी पाळत ठेवून चोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बंगल्यातून साडेसहा लाख रुपये रोख व दोन किलो सोने लुटून नेले आहे. शिवमणी आपल्या कुटुंबियासमवेत रविवारी कुंभमेळ्यातून मुंबईत परतले. त्यावेळी त्यांना आपल्या बंगल्याचे कुलूप तोडलेले लक्षात आले त्यानंतर घरातील सामानाची शोधा-शोध केली असता चोरीचा प्रकार समोर आला.